कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वेने प्रवाशांना 1 मीटर अंतर ठेवून वाटले तिकिटे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ मार्च २०२०

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वेने प्रवाशांना 1 मीटर अंतर ठेवून वाटले तिकिटे

चंद्रपूर:
सर्व जगभरात कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात सुद्धा कोराना (कोविड-19) विषाणूंचा प्रसार होत आहे.परंतु, हा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपायासाठी पाऊले उचललेली आहे. यामध्ये, बस स्थानक, रेल्वे स्थानक यांनीदेखील प्रतिबंधात्मक विशेष खबरदारी घेतली आहे.


रेल्वे प्रशासनाने जिल्ह्यातील रेल्वेस्थानकावर तिकीट काढणे, चौकशी व आरक्षण संदर्भात माहितीसाठी रेल्वेस्थानकावरील तिकीट घरांमध्ये दोन प्रवाशांमधील अंतराची 1 मीटरची मार्किंग केलेली आहे. या मार्किंगमध्येच प्रवाशांनी 1 मीटर अंतर राखूनच रेल्वे तिकीट किंवा रेल्वे संदर्भात चौकशी करावी.या मार्किंगमध्येच तिकीट प्रवाशांना देण्यात येत आहे. यामुळे संसर्गाचे प्रमाण कमी होते.अशी माहिती स्टेशन मास्तर के.एस.एन.मूर्ती यांनी दिली. तसेच नागरीकांनी गरज नसेल तर घराबाहेर पडून गर्दी करू नये,असे आवाहन देखील त्यांनी केले.

याबरोबरच, रेल्वेस्थानकांवर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमित रेल्वे स्थानकाची स्वच्छता, जनजागृती विषयक उद्घोषणा, पोस्टर,फलके लावण्यात आली आहे. तसेच,रेल्वेस्थानकांवर महानगरपालिकेमार्फत मदत कक्ष देखील स्थापन केलेले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनासंदर्भात अधिक माहितीसाठी व मदतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय 07172-270669, जिल्हा परिषद आरोग्य विभाग 07172-261226,चंद्रपुर महानगरपालिका 07172-254614 या प्रमुख क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.