मुलांचा पालकांकडे आग्रह:आई मला खेळायला जायचं जाऊ देणं व... - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३१ मार्च २०२०

मुलांचा पालकांकडे आग्रह:आई मला खेळायला जायचं जाऊ देणं व...

मुले घरात कंटाळली,पालकही वैतागले
रेखांकन करून खेळु लागले बैठे खेळ
नागपूर : अरूण कराळे:
राज्यात कोरोना विषाणूची लक्षणे आढळतात मुख्यमंत्री व राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने तात्काळ निर्णय घेत या साथीच्या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून राज्यातील खाजगी तसेच शासकीय प्राथमिक,माध्यमिक,उच्च-माध्यमिक शाळा,महाविद्यालये सर्वप्रथम बंद करीत १६ मार्च ते ३१ मार्च पर्यंत सुट्या जाहीर केल्या.

परंतु या संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रसार बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी१४ एप्रिल पर्यंत देशात लॉकडाऊन केल्याने कोणालाही बाहेर पडता येत नसल्याने मुले घरात राहून-राहून कंटाळली असून वरच्या वर्गातील मुलांनी स्वतःचा विरंगुळा दूर करण्यासाठी शक्कल लढवत घराच्या परिसरात कौंटुंबीक भावंडाना तसेच शेजारील मित्रांना सोबत घेऊन अंतर राखत रेखांकन करून बैठे खेळ खेळत आहे.तर मोठ्यांना खेळतांना बघून आई मला खेळायला जाऊ देणं ग म्हणत आपल्या आईकडे चिमुकलेआग्रह करीत आहे.
सुट्या म्हणजे धुमधाम मस्ती असा मुलांचा समज आहे,परीक्षा होणार नाही हे कानावर पडताच दुधात साखर पडल्यासारखे जाम खुश झालेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीचे सुट्यांचे दिवस खूब मजेत घालत असतानाच देशात लॉक डाऊन घोषित केल्यानंतर कुणालाही बाहेर पडता येऊ न लागल्याने मुलांच्या खुशीवर पाणीच फेरल्या गेले.पालक मुलांना घराबाहेर जाऊ देत नसल्याने घरात किती वेळ काय करणार,म्हणून नटखट मुले घरातच मस्ती करू लागले शेवटी पालकही त्रस्त होत नियमित शाळाच बरी होती अशा प्रतिक्रिया घरा-घरातून उमटत आहे.

शासनाने इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या परिक्षा रद्द केल्यामुळे आमचीही परीक्षा व्हायला पाहिजे असे इयत्ता नववी व ११वी चे विद्यार्थ्यांचे मनसुबे आहे.इयत्ता १० वी चा भूगोल विषयाचा पेपर होणे बाकी आहे.सध्यातरी अभ्यास नाही,बाहेरही फिरता येत नाही.मैदानी खेळ खेळता येत नसल्यामुळे विदयार्थ्यांनी आपला एकांतवास,विरंगुळा दूर करण्यासाठी बैठे खेळात मोडणारे विविध खेळांपैकी चंगाआष्टा,साप-सीडी,कॅरम,बुद्धीबळ, मनुष्याची नावे व गावाच्या नावाच्या भेंड्या,तसेच हिंदी मराठी गाण्याच्या अंताक्षरी,आदी खेळ खेळत असल्याचे चित्र आहे.

आजच्या घडीला कोरोना शब्द सर्वांच्या तोंडी असला तरी लहान निरागस मुलांना याबद्धल काहीच कल्पना नसल्याने कोरोना म्हणजे काय?यामुळे काय होते?असे घरात किती वेळ चालणार,परीक्षा कधी होणार,शाळा केंव्हा सुरू होणार? असे बुचकड्यात टाकणारे अनेक प्रश्न आई-वडिलांना विचारून निरुत्तर करतात.त्यामुळे पालकही वैतागून गेले आहे.