तेलंगणाच्या राजकीय नेत्यांच्या बलात्कारी आरोपी मुलाला नागपुरात वाड़ी पोलिसांकड़ून सिनेस्टाईल अटक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

तेलंगणाच्या राजकीय नेत्यांच्या बलात्कारी आरोपी मुलाला नागपुरात वाड़ी पोलिसांकड़ून सिनेस्टाईल अटक

बुधवार पर्यंत पोलीस कोठडी 
नागपूर : अरुण कराळे 
बलात्कार केल्यानंतर तरुणीला ब्लकमेल करणाऱ्या तेलंगणाच्या एका राजकीय नेत्यांच्या बलात्कारी मुलाला वाडी पोलिसांनी वाडी पोलिसांनी शुक्रवार १३ मार्च रोजी सिनेस्टाईल अटक केली .

योगेश्वर पांडुरंग पाटील वय २१ वर्ष असे आरोपीचे नाव असून तो तेलंगणाच्या संगरेड्डी जिल्ह्यातील राजोला येथील रहिवासी आहे, पीडित तरुणी ही एल. एल. बी. चे शिक्षण घेत असून तिने तेलंगणाच्या पट्टणचूर जिल्ह्यातील मडके गावात वर्ग ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेतले. दरम्यान तिची ओळख योगेश्वर सोबत झाली.त्यानंतर तरुणीने उच्च शिक्षणासाठी नागपूर गाठले .

एलएलबीचे शिक्षण घेण्यासाठी ती महिला वस्तीगृहामध्ये राहू लागली. या वेळी योगेश्वर तिच्याच नातेवाईका सोबत तिला भेटायला येऊ लागला. जुन्या ओळखीमुळे त्याने तिच्या परिवाराशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.हि बाब कळताच तिने घाबरून त्याला मोबाईल नंबर देऊन बोलण्यास सांगितले या नंतर योगेश्वरने तिच्याशी मोबाईल वरून बोलणे सुरू केले 

सततच्या कॉल मुळे तिने त्याला परिवारातील सदस्यां सोबत बोलणे बंद करण्यास सांगितले पण त्याने दोघांची ओळख घरी सांगण्याची धमकी दिली हळूहळू दोघांमध्ये प्रेम जुळले आणि योगेश्वर ने तिला मार्च जुलै आणि नोव्हेंबर २०१९ च्या दरम्यान वाडी जवळील सुराबर्डी टेकडीवर नेऊन दोनदा बलात्कार केला काही अश्लील फोटोही काढले.

 त्यानंतर योगेश्वर ने तिला त्रास देणे सुरू केले जबरदस्तीने फिरायला चालण्यास म्हणू लागला तिने जाण्यास नकार दिल्यानंतर घरातील सदस्यांच्या मोबाईलवर अश्लील फोटो पाठविण्याची धमकी देऊ लागला तरुणीच्या वडिलांनी ९ मार्च २०२० रोजी थेट वाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली पोलिसांनी पीडित तरुणीच्या माध्यमातून योगेश्वरला मोबाईलवरून मॅसेज पाठवून बोलविले योगेश्वरच्या मोबाईल चा सीडीआर काढल्यानंतर तो नागपुरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली पण त्याने तीन ते चार दिवस पोलिसांना चकमा दिला शेवटी पांचव्या दिवशी पीडित तरुणीने त्याला कॉल करून अमरावती हायवे कॅम्पस बसस्टॉपवर बोलविले तेथेच वाडी पोलिसांनी त्याला पकडले आरोपी योगेश्वर विरुद्ध कलमा अपराध क्रमांक ०९ / २०२० अन्यवे कलम ३७६/ ५०० / ५०७ भादवी ९७,६७ व अन्य कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून शनिवार १४ मार्च रोजी न्यायालयासमोर हजर केले असता बुधवार १८ मार्च पर्यंतपोलीस कोठडी मंजूर केली .

आरोपी एका राजकीय नेत्यांचा मुलगा असल्याचे पोलिसांना सांगितले त्याला वाचविण्याकरिता पोलिसांवर राजकीय दबाव आणण्यात आला परंतु पीडित तरुणी एका पोलीस अधिकाऱ्याची नातेवाईक असल्यामुळे प्रकरण दडपू शकले नाही. व वाडी पोलिसांनी सुद्धा प्रकरण दडपन्यास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे वाडी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सर्व कर्मचारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.