दोन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

दोन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू


दहावीच्या परीक्षार्थी मित्राला आणण्यासाठी जाताना वाहनाची धडक

चंद्रपूर : मूल रोडवर चिचपल्ली गावाजवळ आज दुपारी अंदाजे 2:30 वाजता दहावीचा पेपर सुटल्यावर परीक्षार्थी मित्राला आणण्यासाठी दुचाकीने गेलेल्या दोन मित्रांचा अज्ञात वाहनांच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. अनिकेत प्रशांत सागोरे (18), व देवानंद सोयाम (19) अशी मृत विद्यार्थांची नावे आहेत.
दहावीचा पेपर सुटल्याने अनिकेत व देवानंद हे दोघेही मित्राला घेण्यसाठी दुचाकीने चिचपल्लीच्या दिशेने जात होते. दरम्यान, अज्ञात वाहनाने चिचपल्लीजवळ दुचाकीला जबर धडक दिल्याने अनिकेत व देवानंद यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीत तपासणीसाठी पाठविले.