डॉ.अंजली साळवे यांची obc जनगणनेची ‘पाटी’ संसदेत खा.अमोल कोल्हे यांच्या हाती - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ मार्च २०२०

डॉ.अंजली साळवे यांची obc जनगणनेची ‘पाटी’ संसदेत खा.अमोल कोल्हे यांच्या हाती


ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे; खा. डॉ. अमोल कोल्हे यांची संसदेत मागणी

नागपुर/प्रतिनिधी:
ओबीसी प्रवर्गाची जनगणना झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत केली आहे. यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्रात डॉ. ऍड अंजली साळवे यांनी महाराष्ट्रात सुरु केलेल्या ‘पाटी लावा’ मोहिमेचा विषेष उल्लेख करीत ही पाटी देखील दाखविली.

शुक्रवारी (दि. 13) लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान 2021 मध्ये होणा-या जनगणनेत जातीनिहाय जनगणना व्हावी आणि सोबतच ओबीसींचा कॉलम स्वतंत्ररित्या समाविष्ट केला जावा, अशी मागणी खासदार कोल्हे यांनी केली. यावेळी कोल्हे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'हु वेअर द शुद्राज' या ग्रंथाचा दाखला देत ओबीसींची स्वतंत्र जनगणना होणार नाही तोपर्यंत सरकारला त्यांचे खरे प्रश्न समजणार नाहीत, असं म्हटलं.


डॉ. ऍड अंजली साळवे यांच्या ‘जनगणना 2021 मध्ये ओबीसीचा कॉलम नाही, म्हणून आमचा जणगणनेत सहभाग नाही’ असा संदेश असलेली पाटी लोकसभेत दाखवून डॉ. कोल्हे यांनी भाषणाचे वेळी सर्वांचे लक्ष वेधले. समाजातील अंतिम घटकाला न्याय देण्यासाठी, त्यांच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्यासाठी ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याची विनंतीही डॉ. कोल्हे यांनी केंद्र सरकारला केली आहे. 

ओबीसी जनगणना विषय संसदेत उपस्थित करावा याबाबत दिल्ली येथे डॉ साळवे यांनी डॉ अमोल कोल्हे यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली करुन महाराष्ट्रात ओबीसी बांधव राबवत असलेल्या ‘पाटी लावा’ मोहीमेची माहिती दिली होती आणि लगेच, त्याच दिवशी डॉ. कोल्हे यांनी ओबीसी जनगणनेची मागणी व पाटी लावा मोहीम संसदेत उपस्थित केली, यासाठी डॉ ऍड. अंजली साळवे यांनी त्यांचे आभार मानले. ओबीसीचा कॉलम जनगणना प्रश्नावलीत नसेल तर ओबीसीनी सरकारलाही पाटी दाखवावी असे आवाहन डॉ साळवे यांनी केले असून संसदेत महाराष्ट्रातून ओबीसी समाजाचे प्रतिनिधीत्व करणा-या अनेकांपैकी केवळ डॉ. अमोल कोल्हे आणि बाळू धानोरकर या दोन खासदारांनीच ओबीसी जनगणनेचा विषय संसदेत मांडला आहे 

  • तर इतरांना केवळ पुढिल लोकसभेच्या निवडणुकीपुर्वी ओबीसी समाजाच्या गठ्ठा मतांची आठवण होईल, त्यावेळी त्यांना ओबीसींचा पुळका येईल. तिकीट किंवा मंत्रीपद मिळाले नाही तर ओबीसी असल्यानेच आम्हाला डावलल्याची ओरड करून ओबीसींची सांत्वना मिळविणारे नेतेही ओबीसी जनगणनेच्या विषयावर शांत असल्याबद्दल डॉ. अंजली साळवे यांनी खेद व्यक्त केला आहे.