धक्कादायक:नागपुरात कोरोना बाधितांची संख्या 10 वर:आणखी २ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ मार्च २०२०

धक्कादायक:नागपुरात कोरोना बाधितांची संख्या 10 वर:आणखी २ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ

कोरोना/करोना/करो ना (कविता)
नागपूर/प्रतिनिधी:

नागपुरात शनिवारी सकाळी आणखी 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी खामला परिसरातील 43 वर्षीय व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आज सकाळी 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्याने खळबळ उडाली.यात एका 17 वर्षाच्या मुलीची चाचणी पॉझिटिव्ह असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे,ज्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी दिल्लीवरून नागपूर असा प्रवास त्यांनी केला होता. आणि त्यानंतर ते आपल्या दुकानात देखील बसले होते. यात त्यांचा अनेक लोकांशी देखील संपर्क आला होता. या व्यापाऱ्याचा ज्या लोकांसोबत संपर्क आला अशा तीस संशयित रुग्णांची चाचणी शुक्रवारी करण्यात आली. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 10 वर गेलेली आहे.


तर विदर्भात एकूण 15 रुग्ण झाले आहेत. यातील यवतमाळचे 4 आणि गोंदियाचा 1 रुग्ण आहे.