नागपूर:अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ मार्च २०२०

नागपूर:अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू

वाडीतील प्रगती विद्यालयाचे शारीरिक 
शिक्षक अरविंद जाने यांचा अपघातात मृत्यू
नागपूर : अरूण कराळे
वाडी येथील आदर्शनगर मधील प्रगती विद्यालयाचे शारीरिक शिक्षक अरविंद मनोहर जाने यांचे अपघातात दुःखद निधन झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

मिळेेेलल माहितीनुसार मृतक अरविंद जाने वय ४८ रा.काटोल रोड, नागपूर हे गुरुवार ५ मार्च रोजी दुपारी २.४५ वाजताच्या दरम्यान शाळेतून काटोल बायपास रोडनी सुझुकी एक्सेस मोपेड क्रमांक एम .एच. ३१ एझेड ८२४० ने शाळेतून घरी जात असतांना टोल नाक्याजवळ वाडी कडून नागपूरकडे जाणाऱ्या आर. जे. ११ जीबी ५३६६ दहा चाकी ट्रकखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.ट्रक चालक ट्रक सोडून फरार झाला आहे . 

अरविंद जाने सर मूळचे मोर्शी जि. अमरावती येथील असून त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी, एक लहान भाऊ व एकुलता एक मुलगा आहे.सरांच्या दुःखद निधनाने शैक्षणिक क्षेत्रात सर्वत्र शोककळा पसरली आहे.सध्या इयत्ता १० वी व वर्ग १२ वीच्या शालान्त परीक्षा सुरू असून ते प्रगती विद्यालय वाडी केंद्रावर परीक्षा विभागाची जबाबदारी सांभाळत होते. पुढील तपास गिट्टीखदान पोलीस करीत आहे.