नागपुरात एअर होस्टेस कडून केला जात होता देहव्यापार;पोलिसांनी मारली होटेलवर धाड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ मार्च २०२०

नागपुरात एअर होस्टेस कडून केला जात होता देहव्यापार;पोलिसांनी मारली होटेलवर धाड


नागपूर/खबरबात:
नागपुरात एका आलीशान हॉटेलमध्ये देहव्यापार करणाऱ्या हवाई सुंदर यांना छापेमारीत अटक करण्यात आली,गुन्हे शाखेच्या सुरक्षा विभागाने ही कारवाई केली

पोलिसांनी सेंट्रल एव्हेन्यूवरील ओयो टाऊन हाऊस हॉटेलमध्ये छापा टाकून २५ वर्षीय दोन तरुणींची सुटका करुन दोन दलालांसह तिघांना अटक केली.

तुषार ऊर्फ सुल्तान कन्हैय्या पारसवानी (वय २६, रा. न्यू मनीषनगर),नीलेश दिनदयाल नागपुरे (वय १९ रा. कावरापेठ ) व रजत राजेश डोंगरे ( वय २४ रा. वर्मा ले-आऊट), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तुषार हा या व्यवसायाचा मुख्य सूत्रधार असून यापूर्वी २०१८ मध्येही पोलिसांनी त्याला अटक केली होती.

कोलकत्ता बँगलोर मधून दलालांच्या माध्यमातून हा व्यापार चालायचा यासाठी दलाल 15 हजार रुपयाची ग्राहकांना मागणी करायचे व त्यातील 4 हजार रुपये तरुणींना देण्याचे काम दलाल करत होते व वरील 11 हजार रुपये स्वतः ठेवत होते

यासाठी दलाल ही ग्राहकांची संपूर्ण सोय करून ठेवण्यासाठी हॉटेल देखील बुक करून ठेवत होते.सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक किशोर पर्वते, महिला पोलिस उपनिरीक्षक स्मिता सोनवणे, सहाय्यक उपनिरीक्षक सुभाष खेडकर, महिला पोलिस छाया राऊत, सीमा बघेले, दीपिका दानोडे, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा पाटील, विजयाराणी रेड्डी यांना छापा टाकून तिघांना अटक केली. हवाई सुंदरीसह दोघींची सुटका केली. तुषार ,रजत व नागपुरेविरुद्ध गणेशपेठ पोलिस स्टेशनमध्ये अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.