नागपूरकरांनो सावधान:पुण्यापाठोपाठ कोरोना नागपुरात दाखल;१ जण पॉझिटिव्ह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ मार्च २०२०

नागपूरकरांनो सावधान:पुण्यापाठोपाठ कोरोना नागपुरात दाखल;१ जण पॉझिटिव्ह

Image result for corona
ललित लांजेवार:
जगभरात कहर माजविणारा कोरोना पुण्यापाठोपाठ नागपुरात  दाखल झाला आहे.नागपुरातील ७ संशयित रुग्णांपैकी १ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

24 तासात 2 संशयित रुग्ण मेयो इस्पितळात आढळून आले.संशयित रुग्णाच्या थुंकीचे आणि रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यापूर्वी दाखल झालेले 7 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

अमेरिकेहून पाच दिवसांपूर्वी नागपुरात आलेल्या एका व्यक्तीला करोना झाल्याचे निष्पन्न झाले. पाच दिवसांपूर्वी ही व्यक्ती अमेरिकेतून आली. बुधवारी प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालानुसार या व्यक्तीला करोना झाल्याचे निष्पन्न झाले. नागपूरकरांनी आता गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहे.बुधवारी रात्री ८ च्या सुमारास हा अहवाल प्राप्त झाला असून यात एकाला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या व्यक्तीचे वय ४५ ते ५० च्या दरम्यान असल्याचे समजते आहे. 

करोनाची लागण झालेले मुंबईत दोन आणि पुण्यात आठ रुग्ण सापडले असतानाच, नागपुरातही एक करोनाबाधित रुग्ण सापडला आहे. त्यामुळं राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या अकरावर पोहोचली आहे.

कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर युजीसी ने सर्व विद्यापीठांना खबरदारी म्हणून दिल्या सूचना 

नागपूर विद्यापीठाने सर्व परिसंवाद, कार्यशाळा आणि व्याख्यान रद्द 

सर्व परीक्षा केंद्रांवर साबण आणि सॅनिटायझर ठेवण्यासंदर्भात विद्यापीठानं महाविद्यालयांना केल्या सूचना  

खबरदारी घेण्यासंदर्भात सर्व परीक्षा केंद्रांवर फलकांवर सूचना
परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात राज्य सरकारकडून काहीही सूचना नाही