नागपूर:प्रेम प्रकरणातील नैराश्यातून युवकाची आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ मार्च २०२०

नागपूर:प्रेम प्रकरणातील नैराश्यातून युवकाची आत्महत्या

प्रेम प्रकरणातुन या महिन्यात घडलेली दुसरी घटना 
नागपूर:अरूण कराळे 
पोलिस स्टेशन वाडी अंतर्गत येणार्‍या रामजी आंबेडकर नगर आठवा मैल वॉर्ड क्रमांक ४ दवलामेटी येथील आकाश अरुण बोदेले वय २५ या युवकाने स्वत:च्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.या महिन्यात प्रेम प्रकरणातून घडलेली दुसरी घटना असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

प्राप्त पोलीस सुत्राच्या माहितीनुसार मृतक आकाश याचे तीन ते चार वर्षांपासून परिसरातील राहणार्‍या एका मुलीवर प्रेम होते.मुलीचीही संमती असल्यामुळे दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे दोघांनीही लग्न करण्याचा निर्धारही केला होता.मुलीचा घरच्यांचा या गोष्टीला विरोध होता.तरीही मृतक आकाश ९ मार्चला मुलीचा घरी तिच्या वडिलांशी बोलणी करायला गेला असता त्यांच्यात शाब्दिक वाद होऊन हाणामारीही झाल्याची माहिती पुढे येत आहे.मारहाणीचे प्रकरण पोलिस स्टेशनला गेले असता पोलिसांनी दोन्ही कुटुंबियांची समजूत काढली.दोन्ही परिवारात समझोता झाल्याने गुन्हा नोंदविला गेला नाही.परंतु आकाशला झालेली मारहाण व मुलीच्या कुटुंबियांनी लग्नासाठी केलेला विरोध या गोष्टीमुळे नैराश्य निर्माण होऊन तो उदास व दु:खी असायाचा.

सोमवार १६ मार्च रोजी सकाळी ४ वाजताच्या दरम्यान घरच्या स्टोअर रूममधील सिलिंगच्या पंख्याच्या हुक्कला दोरीचा सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.मृतकाच्या अंतिम- संस्काराला त्याच्या प्रेयसी जावू नये म्हणून तिच्या घरच्यांनी तिला खोलीत बंद करून ठेवल्याची माहिती पुढे येत आहे.फिर्यादी सावन बोदेले यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय नागपूरला पाठविला.पुढील तपास वाडी पोलीस करीत आहे.