नागपूर:उच्च दाब विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने युवकाचा जागीच मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

नागपूर:उच्च दाब विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने युवकाचा जागीच मृत्यू


नागपूर : अरूण कराळे 
वाडीतील शाहू ले-आऊट मधील नवीन बांधकाम पूर्ण झालेल्या घरी काच फिटींगचे काम करीत असतांना रवींद्र शाहू वय २५ गंगासागर भिवसनखोरी यांचा उच्च दाब विद्युत वाहिनीला स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

प्राप्त पोलीस सुत्राच्या माहितीनुसार शाहू ले-आऊट वाडी प्लॉट नं. ८८ येथे राजकुमार क्षीरसागर यांच्या घराचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून रविवार २२ मार्च रोजी घरीच वास्तुपुजन ठरले होते. काम शेवटच्या टप्यात आल्याने सफेदी व खिडक्यांची काच लावण्याचे काम सुरू होते.बुधवार १८ मार्च रोजी दुपारी १.१५ च्या दरम्यान मृतक रवींद्र शाहू हा पहिल्या माळ्यावर झुल्यावर बसून काच फिटिंग करीत असतांना घराला लागून असलेल्या उच्च दाब विद्युत वाहिनी तारेला त्याचा स्पर्श झाल्यामुळे तारेला चिपकून काही वेळाने खाली फेकल्या गेल्याने डोक्याला जबर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

दुर्दैवी घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरून नागरिकांनी गर्दी झाली होती.घटनेची माहिती नगराध्यक्ष प्रेम झाडे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी रुग्णवाहिका व पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळी गाठून जाऊन पंचनामा केला . 

घराचे बांधकाम करतांना नगरपरिषदेची परवानगी घेतली नसल्याचे माहिती पुढे येत आहे.पुढील तपास वाडी पोलीस करीत आहे.