धक्कादायक नागपुरात पुन्हा वाढला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० मार्च २०२०

धक्कादायक नागपुरात पुन्हा वाढला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा


ललित लांजेवार/नागपूर:
नागपुरात रविवारी सकाळी ३ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सोमवारी पुन्हा सकाळी कोरोना बाधित 2 रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आढळल्याने नागपुरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 14 वरून 16 वर गेलेली आहे, कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी जात असतानाच कोरोनाचा शिरकाव आता नागपुरात वाढतांना दिसत आहे. 

एकूण ४ रुग्ण बरे झाल्यामुळे घरी पाठवण्यात आले आहे. मात्र ते जात नाही तोच आणखी 2 दिवसात 5 रुग्ण तर मागील 5 दिवसात हा आकड़ा दुपट्ट झाला आहे. सोमवारी सकाळी दाखल झालेले हे दोन रुग्ण या अगोदर कोरोना बाधित असलेल्या पेशंटच्या संपर्कात आल्याने त्यांना देखील कोरोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे,त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. 

लॉकडाऊनचे कटेकोरपणे पालन होत नसल्याने प्रशासकीय यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना यश येत नाही. यापुढे नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन केले नाही, तर भविष्यात गंभीर स्थितीला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत सध्या उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीची माहिती दिली.

रविवारी नागपुरात कोरोणाची लागण झालेले एकूण 14 रुग्ण आढळले मात्र सोमवारची पहाट होताच हा आकडा आणखी 2 रुग्णांनी वाढत 16 चा आकडा गाठला. त्यापैकी चार रुग्ण बरे झाल्यामुळे घरी पाठवण्यात आले आहे. उर्वरीत 12 रुग्ण इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत आहेत.

प्रशासन आता या दोन पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेत आहे.