'जनता कर्फ्यु' स्वयंस्फूर्तीने पाळा :महापौर संदीप जोशी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ मार्च २०२०

'जनता कर्फ्यु' स्वयंस्फूर्तीने पाळा :महापौर संदीप जोशी

नागपूर/
 'कोरोना'चे संक्रमण वेळीच थांबावे आणि भविष्यात मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी रविवार २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत लोकांनी कुठेही घराबाहेर पडू नये. स्वतःवर निर्बंध लादून एक दिवस कर्फ्यु पाळावा, असे आवाहन केले आहे. नागपुरातील प्रत्येक नागरिकाने किमान स्वतःसाठी आणि कुटुंबियांच्या आरोग्यासाठी 'जनता कर्फ्यु' पाळावा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे. रविवारी २२ मार्चला कुणी बाहेर तर पडू नयेच, मात्र ३१ मार्च पर्यंत इतर दिवशीही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळावी, अतिआवश्यक कामांशिवाय बाहेर पडू नये, गरज वाटल्यास डॉक्टरांशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.