आवाळपूर,नांदा फाटा परिसरात होम क्वारंटाइन व्यक्तींचा सऱ्हास वावर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० मार्च २०२०

आवाळपूर,नांदा फाटा परिसरात होम क्वारंटाइन व्यक्तींचा सऱ्हास वावर

सक्तीने बंदी करण्याची मागणी
आवाळपूर :-  
 देशभरात कोरोना व्हायरसने  सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्याच धर्तीवर संपूर्ण भारत देशात कर्फू लागू केला. परराज्यातुन, इतर जिल्ह्यातून बाहेरून आलेल्या व्यक्तीस घरी राहण्याकरिता होम क्वारंटाइन चा त्यांचा  हातावर शिक्का मोर्तब केला व त्यांना पुढील 14 दिवस घरी राहण्याची सक्त आदेश दिले आहेत. मात्र आवाळपुर , नांदा फाटा शिक्का मोर्तब असलेले व्यक्ती सऱ्हास वावरताना दिसून येत आहे.

कोरोना व्हायरस नी सर्वत्र पाय पसरले आहे. देश तथा राज्य LOCKDOWN केल्याने सर्वांना धास्ती झाली. त्यामुळे बाहेर राज्यात व इतर जिल्हात नोकरी करिता व शिक्षना करिता गेलेले युवक स्वगृही परतले परंतु येतांना  ते कोरोना ना व्हायरस घेऊन आले नाही ना त्यांचा वर निगराणी व घरीच राहावं करीता त्याचा हातावर शिक्का मोर्तब केला. परंतू या बंद चा काळात ही शिक्कामोर्तब तरुण मंडळी कासलही भीती न बाळगता ते सऱ्हास पणे वावरत आहे एवढेच नाही तर त्यांना समाजविण्याचा प्रयत्न केला असता ते हुज्जत घालत असल्याचे समोर येत आहे..

त्यामुळे होम क्वारंटाइन असलेले व्यक्ती आपल्या घरी न राहता कुठेही दिसल्यास त्याचा वर सक्तीने बंदी करण्याची मागणी नांदा फाटा, आवाळपुर येथील सर्वच राजकिय पक्षाचा नेत्यांनी मागणी केली आहे. 

होम क्वारंटाइन असलेल्या व्यक्तींनी शासनाचा आदेशाचे पालन करून घरीच राहावे. काही व्यक्ती रस्त्यावर फिरतांना दिसून येत आहे. आम्हला कडक पाऊले उचलून सक्ती करण्यास भाग पाडू देऊ नका. 
 ग्रामविकास अधिकारी 
गेडाम साहेब, ग्रामपंचायत नांदा)

आवाळपुरात, नांदा फाटा येथे 255 युवक
कोरोनाची धास्ती भरल्यानंतर सर्वांनी आपल्या स्वगृही जाणे पसंत केले. बरेचसे युवक आपले शिक्षण तर अनेक आपल्या नोकरी सोडून घरी परतले. यात युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आवाळपुर, नांदा फाटा येथे 255 युवक परत घरी आल्याचे सर्वेतून निसकर्षस आले..

अंगणवाडी सेविका व आशा करीत आहे सर्वे 
कोरोनाने थैमान घातल्याने बरेचशे बाहेर राहणारे नागरिक परत आपल्या घरी आले आहेत. परत आले मात्र कोरोना घेऊन तर नाही आले  ना..यामुळे घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका व अशा वर्कर बाहेरून आलेल्या व्यक्तीची नोंद करीत असून कोरोना बाबत जनजागृती सुध्दा करीत आहे.