चंद्रपुर पोलीस विभागातर्फे हेल्पलाईन नंबर सुरू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

चंद्रपुर पोलीस विभागातर्फे हेल्पलाईन नंबर सुरू

Image result for chandrapur police
चंद्रपूर/प्रतिनिधी:
डॉक्टर, नर्स, फार्मासिटीकल्स, रूग्णवाहीका, आरोग्य विभागाशी निगडीत अधिकारी व कर्मचारी आणि इतर वैद्यकीय सुविधा पुरविणाऱ्यासाठी दिनांक २३/०३/२०२० रोजी चंद्रपुर पोलीस जिल्हयात कोरोना या विषाणुचा संसर्ग टाळण्याकरीता संचारबंदी लागु करण्यात आली आहे. 

सीआरपीसी कलम १४४(१)(३) अन्वये वाहन वापरास व वाहतुकीस मनाई आदेश निर्गमीत करण्यात आलेले आहे. तसेच दिनांक २५ मार्च २०२० पासुन संपुर्ण देशभरात २९ दिवस लॉकडॉउन करण्यात आलेले आहे.
उपरोक्त आदेशानुसार पोलीस, आरोग्य विभाग, अत्यावश्यक सेवा,
जिवनावश्यक वस्तु, आपत्ती व्यवस्थापन व प्रसारमाध्यम व त्यांचे प्रतिनिधी
(फक्त कर्तव्यार्थ) यांचेशी निगडीत अस्थापनामध्ये कामकाज करणारे अधिकारी व कर्मचारी यांना आदेशातुन त्यांचे कर्तव्यावर प्रवास करण्यास परवानगी असल्याचे नमुद आहे.

तरी डॉक्टर, नर्स, फार्मासिटीकल्स, रूग्णवाहीका, आरोग्य विभागाशी
निगडीत अधिकारी व कर्मचारी आणि इतर वैद्यकीय सुविधा पुरविणाऱ्यांना चंद्रपुर जिल्हयात कर्तव्य बजावितांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवु नये यासाठी पोलीस अधीक्षक चंद्रपुर कार्यालयामार्फत हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आला आहे.

त्या अनुषगांने चंद्रपुर जिल्हयातील सर्व वैद्यकीय सुविधा पुरविणारे नागरीकांना कळविण्यात येते की, आपणास कर्तव्य बजावितांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास चंद्रपुर पोलीसांतर्फ सुरू केळेल्या खालील हेल्पलाईन व्हाटस्‌ऍप  नंबर: 9404872100 नंबरवर संपर्क साधावा.