शेतात बकऱ्या राखत होता तो,त्याला हरभरा देतो म्हणून बोलावलं आणि केला लैंगिक अत्याचार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ मार्च २०२०

शेतात बकऱ्या राखत होता तो,त्याला हरभरा देतो म्हणून बोलावलं आणि केला लैंगिक अत्याचार


चंद्रपूर/प्रतिनिधी:
शेतात बकऱ्या राखत होता तो,त्याला हरभरा देतो म्हणून बोलावलं आणि त्याच्यावर  लैंगिक अत्याचार केला. हि घटना आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्‍यातील गडचांदूर लगतच्या निमणी या गावातील, पीडित मुलगा ११ वर्षाचा असून त्याचा मित्र वय १५ हे दोघेही गावाजवळील शेतात बकऱ्या राखत असताना आरोपी हा मुलांना हरभरा देतो म्हणून स्वतःच्या शेताकडे दुचाकीवर बसवून घेऊन गेला.

शेतातील बांबूच्या झुडुपाखाली दोघांनाही कपडे काढायला लावले.संधी साधून दोन्ही मुलांनी पळ काढला. मात्र, आरोपी नराधमाने पाठलाग करून ११ वर्षीय बालकाला पकडून उचलून शेतात घेऊन गेला.त्याचे पाय शेतातील वेलांनी बांधून त्याला मारझोड करून त्याच्यावर अत्याचार केला.यात पीडित विद्यार्थी जखमी झाला असून पीडित व त्याच्या मित्राने ही माहिती आपल्या आईला दिली.महादेव उत्तमगोंडे (२८) रा. निमणी असे आरोपीचे नाव आहे. 

आईने व मुलांनी गडचांदूर पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. ठाणेदार गोपाल भारती यांनी शहानिशा करून आरोपींविरुद्ध कलम ३७७ आयपीसी ४/८/१० (३,२,५) पोक्सो,अँट्रोसिटी अँक्टनुसार गुन्हा नोंद करून अटक केली.

माणुसकीला काळिमा फासणारी घटना असल्याने नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.

आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर केले असता ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनात सरू आहे.