वाडी नगर तर्फे भटके विमुक्त समाजाच्या पाड्यावर जाऊन गरजू लोकांना धान्य वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ मार्च २०२०

वाडी नगर तर्फे भटके विमुक्त समाजाच्या पाड्यावर जाऊन गरजू लोकांना धान्य वाटप

डॉ. केशव  हेडगेवार यांचा जन्मदिन निमीत्य
नागपूर : अरूण कराळे 
वाडी नगर तर्फे डॉ. केशव  हेडगेवार यांच्या जन्मदिन निमीत्य वाडी पोलिसांची रीतसर चर्चा परवानगी घेऊन सरकारी नियमानुसारच बुधवार २५ मार्च रोजी  नागलवाडी क्षेत्रातील भटके विमुक्त समाजाच्या पाड्यावर जाऊन गरजू लोकांना पीठ, तांदूळ, तेल तसेच इतर धान्य देण्यात आले . सध्या आपल्या राष्ट्रासमोर मोठं आव्हान उभे राहिलेला आहे आणि निश्चितच आपण सर्व मिळून याचा सामना करणार आहोत. 
शाखेच्या संस्कारातून निर्माण झालेले  स्वयंसेवक राष्ट्र व समजासाठी नेहमीच तत्पर राहतो. सध्या आपल्या सर्वांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसाची साद घातलेली आहे आणि आपण सर्वच त्याचे पालन करणार आहोत परंतु आपल्या समाजात असे अनेक बांधव आहे जे हातमजुरी करतात आणि त्यासर्वा पुढे एक समस्या निर्माण होणार आहे. आज संघ संस्थापक आद्य सर संघचालक डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांचा जन्मदिन, आणि त्यांचं संपूर्ण जीवनच सेवाभावी राहिलेलं आहे जसे सेवा है यज्ञकुंड समिधा सम हम जले. या युगपुरुषाला मानणारे आम्ही सर्वांनी आज वाडी नगर तर्फे नागलवाडी या क्षेत्रात भटके विमुक्त समाजाच्या पाड्यावर जाऊन गरजू लोकांना धान्य वाटप केले.