बाहेर गावावरून आलेला कोणीही व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून आ.किशोर जोरगेवारांकडून आज चंद्रपुरात मोफत टिफिन वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

बाहेर गावावरून आलेला कोणीही व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून आ.किशोर जोरगेवारांकडून आज चंद्रपुरात मोफत टिफिन वाटप

चंद्रपूर/प्रतिनिधी:

कोरोणा विषाणू प्रादूर्भावामुळे 22/03/2020 ला एक दिवसीय जनता कर्फ्यु लादण्यात आल्याने चंद्रपूर शहरातील हॉटेल्स, मेस, बंद असल्यामुळे यंग चांदा ब्रिगेडचे आमदार किशोर जोरगेवार यांनी बाहेरगावा वरून शिक्षण,नौकरी साठी आलेल्या मुला - मुलींना व एकटे राहत असलेल्या वयोवृद्धांना  जेवणाचा कुठलाही त्रास होऊ नये यासाठी आजच्या दिवसाच्या रात्री 9.00 ते 11.00 पर्यंत जेवणाची / टिफिनची व्यवस्था केली आहे.


बाहेरून आलेला कोणीही व्यक्ती माझ्या शहरात उपाशी राहू नये यासाठी जोरगेवार हे भुकेल्यांना मोफत जेवणं देणार आहेत.आपल्या मतदार संघात शहराच्या ठिकाणी दुपारी 3.00 पर्यंत जेवण पाहिजे असणाऱ्या लोकांची नोंद करणार असल्याची माहिती जोरगेवार यांच्या कार्यालयाकडून सांगितले आहे.यासाठी सुबोध जुनावार 8208011642, दीपक वासमवार 8888332289 ,यांच्या नंबरवर संपर्क साधून ज्यांना टिफिन पाहिजे आहे अश्यांनी नोंद करायची आहे.

व आ. किशोर जोरगेवार यांचे जनसंपर्क कार्यालय, जैन भवन जवळ पठाणपुरा रोड, चंद्रपूर येसंपर्क साधून पोटाची भूक भागवायची आहे.