जीएसटीला मुदतवाढ द्या:खासदार बाळू धानोरकर यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे मागणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ मार्च २०२०

जीएसटीला मुदतवाढ द्या:खासदार बाळू धानोरकर यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे मागणी

चंद्रपूर/
 जगामध्ये सध्या कोरोनाचे सावट आहे. कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.व्यापारीदेखील अडचणीत सापडले असून बाजारपेठादेखील बंद आहेत. अशा कठीण परिस्थितीत व्यापाऱ्यांच्या पाठीशी शासनाने खंबीरपणे उभे राहाहून जीएसटी ला मुदतवाढ द्यावी अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे केली आहे.

कोरोनामुळे बाजारपेठ थंडावली आहे. त्यामुळे जीएसटी  इतर कराची माहिती सादर करण्याची तारीख वाढविण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. सध्या कोरोना विषाणुमुळे महामारीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने महामारी घोषित केली आहे. व्यापारी मंडळीदेखील मोठ्या कठीण परिस्थितीतून जात आहे. नेहमी कोणत्याही परिस्थितीत व्यापारी मंडळी सहकार्य करीत समस्या सोडविण्यासाठी तत्पर असतात. परंतु आता या परिस्थितीमुळे व्यापारी समुदाय संकटात पडला आहे. 


मार्च, एप्रिल महिन्यात करदात्यांना निश्चित काळाआधीत GSTR 3B, GSTR 1, GSTR 9 (FY 2018-19), GSTR 9C (FY 2018-19), Vivad Se Vishwas, TDS Payments, TDS Return, Income Tax Return (AY 2019-20), PF, ESIC यासह अन्य माहिती द्यावी लागते. परंतु आर्थिकमंदी, कोरोनामुळे मार्च, एप्रिल महिन्यात त्यांना कराची माहिती सादर करावी लागते. ही तारीख वाढवून देण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.