गडचांदूरात जंतुनाशक फवारणीची मागणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० मार्च २०२०

गडचांदूरात जंतुनाशक फवारणीची मागणी

गडचांदूर/प्रतिनिधी
शहरांतील सर्वात मोठा प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक एकमधील भागात जंतुनाशक फवारणी करण्याची मागणी येथील श्रीकांत मोहारे यांनी केली आहे.

   शहरातील अनेक भागात नगर परिषद अंतर्गत फवारणी केली आहे.परंतु वस्तीने दाट असलेल्या प्रभाग एक मधील अनेक भागात जंतुनाशक फवारणी केलेली दिसत नसल्याचे  नागरिकांचे मत आहे.अनेकांनी याबाबतीत तक्रारी देखील केल्या परंतु याभागात अजूनही जंतुनाशक फवारीन केलेली नाही.
काल आलेल्या धुवधार पावसाने नाल्या तुंबून भरल्या यात प्लास्टिक युक्त कचरा निघाल्याने पर्यावरण धोक्यात असल्याचे दिसते आहे.प्लास्टिक वर बंदी असताना एवढ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा निघाल्याने प्रश्न निर्माण होत आहे.

लोकसंख्येने सर्वात मोठा असलेल्या प्रभाग एक मधील वैशाली नगर ,संत गाडगेबाबा नगर ,याभागात फवारणी मारण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या मागणीची नगर परिषद तसेच प्रशासन यांनी दखल घेऊन फवारणी करण्याची मागणी श्रीकांत मोहारे यांनी केली आहे.