कोरोनाची लागण होऊ नये म्हणून वीजबिल भरणा ऑनलाइन व मोबाईल अँपद्वारे भरण्याचे महावितरणचे आवाहन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ मार्च २०२०

कोरोनाची लागण होऊ नये म्हणून वीजबिल भरणा ऑनलाइन व मोबाईल अँपद्वारे भरण्याचे महावितरणचे आवाहन

नागपूर/प्रतिनिधी: 
सध्या जागतिक पातळीवर संकट ठरलेल्या कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सर्वत्र व्यापक उपाययोजना करण्यात येत असताना महावितरणकडून देखील खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी वीज ग्राहकांनी वीज बिल भरणा केंद्रावर गर्दी न करता महावितरण मोबाईल आप आणि इतर पर्याया द्वारे घरबसल्या सुलभतेने वीज देयकाची रक्कम भरावी, असे कळकळीचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना करण्यात येत असताना महावितरणकडून देखील खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्याअंतर्गत बायोमेट्रिक्स हजेरी यापूर्वीच बंद करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महावितरण प्रशासनाने कार्यालयात हात धुण्यासाठी सॅनिटायझर ठेवले आहेत. तसेच काही ठिकाणी तोंडाला लावण्यासाठी मास्क देखील उपलब्ध करून आवश्यक ती खबरदारी महावितरणकडून घेण्यात येत आहे.

  खबरदारीच्या उपाय म्हणून चेहऱ्यावर मास्क लावून काम
करताना महावितरणच्या धंतोली शाखा कार्यालतील जनमित्र
ग्राहकांना ऑनलाईनच्या माध्यमातून वीज देयकाची रक्कम भरण्याची सुविधा महावितरणकडून १० वर्षापूर्वीच सुरु करण्यात आलेली आहे. वीज ग्राहक महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेत स्थळवरून अथवा महावितरणच्या मोबाइलला अँप द्वारे वीज देयकांचा ऑनलाईन भरणा करू शकतात. सोबत गूगल प्ले, फोन पे, पेटीम, भीम अँप या सारख्या पर्यायाचा वापर करून वीज बिलाचा भरणा करता येते.

क्रेडिट कार्डचा अपवाद वगळता उर्वरित ईतर सर्व पद्धतीने (नेटबँकिंग,यूपीआय,डेबिट कार्ड,डिजिटल वॉलेट, कॅशकार्ड ) वीज देयकाचा भरणा केल्यास ग्राहकांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ऑनलाईन पद्धतीने भरणा केल्यास ग्राहकास त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर SMS द्वारे त्वरित पोच मिळते.www.mahadiscom.in या संकेत स्थळावर Payment history तपासल्यास वीज बिल भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते.

नागपूर शहरात दरमहा एक लाखापेक्षा अधिक वीज ग्राहक या माध्यमातून वीज देयकाची रक्कम भरतात.वरील पर्यायासोबतच वीज ग्राहकांना महावितरण मोबाईल अँपच्या माध्यमातून आपल्या वीज देयकांचा भरणा करता येतो. वीज ग्राहकांच्या सोयीसाठी तीन वर्षांपूर्वी सर्व वीज ग्राहकांसाठी एसएमएस सेवा सुरु केली होती. या माध्यमातून वीज ग्राहकास त्याच्या घरी मीटर वाचनासाठी कर्मचारी कधी किती वाजता येणार आहे, ठराविक कालावधीत वीज ग्राहकाने किती विजेचा वापर केला. वीज ग्राहकास देयकाची किती रक्कम भरावयाची आहे

 चेहऱ्यावर मास्क लावून कामावर निघताना
गोकुळपेठ शाखा कार्यालयातील जनमित्र
याची माहिती एसएमएसच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जात आहे. आहे. सोबतच वीज पुरवठा बंद राहणार असल्यास याची माहिती देखील एसएमएसच्या माध्यमातून देण्यात येत आहे. या सर्व महत्वपूर्ण सुविधांचा लाभ घेण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या ,मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वीज ग्राहकांनी "गो ग्रीन"चा पर्याय स्वीकारल्यास दरमहा त्याला वीज देयकाच्या रकमेत १० रुपयांची सूट मिळते. अशा प्रकारे वीज ग्राहकास वार्षिक १२० रुपयांची सुट प्रत्येक देयकाच्या मागे मिळते. नागपूर परिक्षेत्रात आत्तापर्यंत सुमारे १५ हजार वीज ग्राहकांनी याचा अवलंब केला असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.