आधी कोरोनाचा निकाल;नंतर दारूबंदीचा निकाल :वडेट्टीवार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ मार्च २०२०

आधी कोरोनाचा निकाल;नंतर दारूबंदीचा निकाल :वडेट्टीवार

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीची समीक्षा करण्यासाठी गठित समितीने १६ मार्चला राज्याचे बहुजन कल्याण,मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे अहवाल सादर केला. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या प्रशासकीय यंत्रणा कोरोना आजाराच्या प्रतिबंधात्मक उपायोजनांमध्ये व्यस्त असून प्राध्यान्यक्रमानुसार सध्या कोरोना पासून लोकांचा बचाव करणे महत्वाचे असल्यामुळे दारूबंदी समिक्षा समितीने आज अहवाल सादर केला असला तरी तो अहवाल मी वाचला नाही असे सांगत तुर्तास जिल्ह्यात कोरोनाविरूध््द लढाई पहील्यांदा लढू नंतर दारूबंदीचे काय ते बघू असे सांगत जे लोकांच्या मनात आहे तेच अहवालात असेल असा सूचक इशारा पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी दिला.  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्य शासनाने एप्रिल २०१५पासून जिल्ह्यामध्ये दारूबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला दारूबंदी बाबतच्या निर्णयाबाबत भिन्न मते मतांतरे असूनयासंदर्भात पालकमंत्री यांच्याकडे लेखी वतोंडी निवेदने प्राप्त झाली होती. त्यानंतरया संदर्भात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या बंदीची समीक्षा करण्याचा निर्णय घेतला होता. या समितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले,महानगरपालिका चंद्रपूरचे आयुक्त संजयकाकडे, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांचा सहभागआहे. नियोजन भवनात आज या समितीनेआपला अहवाल पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांना सादर केला पालकमंत्रीना. विजय वडेट्टीवार यांनी या समितीच्यासर्व सदस्यांनी अतिशय मेहनतीने सादरकेलेल्या या अहवालाच्या संदर्भातआवश्यक व्यासपीठावर योग्य तो निर्णयघेतला जाईल. तुर्तास प्रशासनाने कोरोनाप्रतिबंधात्मक कामांवर लक्ष वेधावे, असेआवाहन केले आहे.