कोरोना हायअलर्ट:चंद्रपूरची महाकाली यात्रा रद्द - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ मार्च २०२०

कोरोना हायअलर्ट:चंद्रपूरची महाकाली यात्रा रद्द

Image result for mahakali mandir
चंद्रपूर/ललित लांजेवार:
मध्य भारतातील सर्वात पुरातन तीर्थस्थळ असलेल्या महाकाली देवीची यात्रा दरवर्षी चैत्र महिन्यात भरते. मात्र यंदा गुडीपाडव्यापासून सुरु होणाऱ्या हि चैत्रातील महाकाली यात्रा रद्द करण्यात आली आहे.

संपूर्ण जगभरात महामारी घोषित करण्यात आलेल्या कोरोनाचा महाराष्ट्रातही शिरकाव झाल्याचं स्पष्ट झालं, नंतर गर्दीच्या ठिकाणी लोक जमून चुकून कोरोना बाधितांची संख्या वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने महाकाली मंदिर ट्रस्ट सोबत मिळून हा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे येथे गर्दी नियंत्रण करतानाच जनजागृती व्यापक प्रमाणात करावी. यात्रा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत असे आदेश राज्यसरकारने दिले होते . अश्यातच चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने देखील जिल्ह्यातील सर्वात मोठी होणारी महाकाली यात्रा देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 


अशातच पुणे, मुंबई आणि नागपुरमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळून आल्यानं नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं आहे.सध्या महाराष्ट्रात एकूण 11 कोरोना बाधीत आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अशा तच कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. 

यंदाच्या महाकाली यात्रेला गुडीपाडव्यापासून प्रारंभ होणार होता,मात्र कोरोनाच्या भीतीमुळे हि यात्रा रद्द करण्याचा निर्णय जिल्ह्या प्रशासनाने घेतला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी माध्यमांना दिली.

या महाकाली यात्रेत महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील देखील भाविक येतात,तेव्हा खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तर मंदिर परिसरातील दुकानदार देखील या यात्रेच्या तयारीला लागले होते,यात्रेच्या सामानासह अनेक वस्तूंचे दुकान देखील या मंदिर परिसरात लागतात त्या दुकानदारांनी येणाऱ्या यात्रेसाठी आपल्या दुकानात सामान भरण्यासाठी पैस्याची जुडवा जुडव केली, मात्र यात्रा रद्द होण्याची माहिती मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर निराशा बघायला मिळत आहे.