कोरोना अलर्ट: चंद्रपुरात 4 कोरोना संशयित रुग्णांवर उपचार सुरू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

कोरोना अलर्ट: चंद्रपुरात 4 कोरोना संशयित रुग्णांवर उपचार सुरू

चंद्रपुर/ललित लांजेवार:

जगभरात कोरोना ने हाहाकार माजवला असून आता भारतात देखील हा कोरोना पाय पसरु लागला आहे.


महाराष्ट्रातही दररोज कोरोनाच्या संशयित रुग्णाची संख्या वाढू लागली असून चंद्रपूरातील सिंदेवाही तालुक्यातील एका गावातील एकाच परिवारातील तीन लोकांना चंद्रपूर येथील रुग्णालयात रविवारी रात्री 1.30 वाजताच्या दरम्यान दाखल करण्यात आले आहे.यातील कुटुंब प्रमुख हे हज यात्रेवरुन परतले होते.त्यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत असल्यामुळे ते खाजगी रुग्णालयात गेले,मात्र डॉक्टरांनी त्यावर चंद्रपुरला जाण्याचा सल्ला दिला.
संग्रहित

शनिवारी रात्री चंद्रपुर येथील डॉक्टरांच्या चमुने 108 रुग्णवाहिकेतुन त्यांना त्यांच्या गावातुन चंद्रपुर येथे आणले. या एकाच परिवारातील तीन व्यक्तींचे तपासासाठी घेतलेले नमुने हे लॅबमध्ये पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल रविवारी संध्याकाळपर्यंत प्राप्त होणार आहे. सध्या त्यांना डॉक्टरांच्या निगरानीत ठेवण्यात आलेले आहे.


तर चंद्रपुर शहरातील एक व्यक्ती दुबईवरून परतला असल्याने त्याची देखील तपासणी करण्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या संशयित रुग्णाचा अहवाल देखील रविवारी संध्याकाळपर्यंत प्राप्त होणार असल्याची माहिती आहे,त्यामुळे चंद्रपूरकरांना सतर्क राहण्याची गरज भासू लागली आहे.