ग्राहक पंचायत चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी गठीत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ मार्च २०२०

ग्राहक पंचायत चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी गठीत

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्राहकांच्या समस्या संघटितपणे सोडविण्यासाठी आणि त्यांच्या जागृतीसाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्राची चंद्रपूर जिल्हा नवीन कार्यकारिणी आज ग्राहक पंचायतचे विदर्भ सचिव लीलाधर लोहरे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथी चंद्रपूरच्या नगरसेविका छबुताई वैरागडे यांच्या उपस्थितीत आज दिनांक 7 मार्च 2020 रोजी गठित करण्यात आली.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे आराध्यदैवत स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.ग्राहकतीर्थ मा. बिंदुमाधव जोशी हे आपले प्रेरणा स्रोत आहेत व त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आणि विचारा वर दलीय व पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एक मताने आपण मार्गक्रमण करून ग्राहकहित जपू या, असे अध्यक्षीय आवाहन करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वेदांत मेहरकुळे यांनी कुशलपणे केले. चंद्रपूर चे प्रसिद्ध वकील श्री राजेश विरानी तसेच महावितरणचे निवृत्त अधिकारी दयाशंकर कन्हैया सिंह यांनी व्यासपीठावरून ग्राहक कार्यकर्त्यांना संबोधित केले.

चंद्रपूर जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र ची कार्यकारिणी
पदाधिकारी
अध्यक्ष:परशुराम जनार्दन तुंडूलवार
उपाध्यक्ष=वेदांत वसंतराव मेहरकुळे
संघटक =जनार्धन जयराम धगडी
सहसंघटक=महेश लक्ष्मणराव काहीलकर 
सचिव =आनंद केशवराव मेहरकुरे
सहसचिव =किशोर उमराव बांते 
महिला संघटक=सारिका प्रशांत बोराडे
 महिला सहसंघटक=मनिषाताई बोबडे 
प्रमुख सल्लागार= छबुताई वैरागडे 
कोषाध्यक्ष=मनोहर शेंडे 
कायदेविषयक सल्लागार=एडवोकेट राजेश विराणी 
प्रसिद्धीप्रमुख=पौर्णिमा बावणे
वरोरा तालुका प्रमुख =श्री श्याम ठेंगडी
सदस्य 
अशोक गुरुवले ,चांदमणी दत्ता , मेनका राणा, पूजा शेरकी, संगीता गाजरे, अक्षय येरगुडे, डी एम गड्डमवार, वसुधा बोडखे, अण्णाजी जोगी, नामदेवराव सालवटकर, सुरज शर्मा, आशिष गांडली , व्हीं एम शेलोटे, डि जी दुरटकर , एडवोकेट प्रतीक राजेश विराणी, दयाशंकर कन्हैया सिंह, कांचन माकोडे, डॉक्टर सपनकुमार दास सर्व सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी ग्राहक हिता संबंधित प्रश्‍न शासन दरबारी मांडून न्याय मिळविण्यासाठी एक मताने प्रयत्न करणार असल्याचे निश्चित केले.