चंद्रपूर:अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड;14 तरुण अटकेत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ मार्च २०२०

चंद्रपूर:अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड;14 तरुण अटकेत

चंद्रपूर/ललित लांजेवार:
अवैधपणे चालू असलेल्या हुक्का पार्लर अड्ड्यावर रामनगर पोलिसांनी शनिवारी संध्याकाळच्या दरम्यान धाड टाकली ,यात १४  युवकांना अटक करण्यात आली.

शहरातील गोल्डन रेस्टॉरंटमध्ये हा हुक्का पार्लर चालत असल्याची गुप्त माहिती रामनगर पोलीसांना मिळाली होती.रामनगर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाला या बाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापडा रचत गोल्डन गोल्डन रेस्टॉरंट वर धाड टाकली.

                                                       
यात शहरातील अनेक जानी-मानी हस्ती ट्रान्सपोर्ट,राजकारणी,बिझनेस मॅन,यांची मुलं अडकली असल्याची माहिती  सूत्रांकडून सांगण्यात येते  .यात ४ अल्पवयीन आरोपींचा  देखील समावेश असल्याची माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली.

सोबत हूक्का संदर्भात वस्तू व वोडका दारूचा बंपर,डझनभर हुक्का पॉट, प्रतिबंधित तंबाखू, फ्लेवर्स आदी मोठी सामुग्री जप्त,केले. व त्यांना अटक करून रामनगर पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले.दाताला रोड वरील गोल्डन रेस्टॉरंट हे जयस्वाल नामक व्यक्तीचे असून या रेस्टॉरंटमध्ये नेहमीच या ठिकाणी येत एन्जॉयमेंट करत असल्याची माहिती समोर आलेली आहे.पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवन्त्त नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश हाके व PSI कापडे करीत आहे.