चंद्रपुर:वेळेवर उपचार न मिळाल्याने एकाचा हार्टअटैक ने मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० मार्च २०२०

चंद्रपुर:वेळेवर उपचार न मिळाल्याने एकाचा हार्टअटैक ने मृत्यू

चंद्रपूर/ललित लांजेवार:

संचारबंदीत दवाखाने बंद असल्याने उपचाराअभावी चंद्रपुरात एकाचा मृत्यू झाला.मोतीलाल पथाडे असे या मृत व्यक्तीचे नाव असून ते सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी होते. हि घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. लॉकडाउन झाल्यानंतर सर्व मार्ग बंद झाले. अन शुक्रवार पासून त्यांचं छातीत दुखत असल्याचे त्यांना लक्षात आले.

 मात्र बाहेर पडू शकत नसल्याने त्यांनी आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले.शहरातील हवेली गार्डन परिसरात ते वास्तव्यास होते.ते नेहमी सकाळी मोर्निग वॉकला जायचे मात्र जेव्हा पासून संचारबंदी लागली तेव्हा पासून त्यांचे फिरणे बंद झाले. 

संध्याकाळी चार वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्या मदतीला शेजारी धावून गेले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्यानंतर त्यांचा मृतदेह परत घरी आणण्यात आला. विशेष म्हणजे 
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी सर्व खासगी डॉक्टरांना आपले दवाखाने सुरू करण्याचे निर्देश दिले, तसेच जे याचे पालन करणार नाहीत 
त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्याच्या या निर्णयानंतर खाजगी डॉक्टरला दवाखाने बंद ठेवता येणार नाही.