चंद्रपूर:जमावबंदी आदेशाचे उल्ल्घन करणाऱ्या ३९ जणांवर गुन्हे दाखल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२५ मार्च २०२०

चंद्रपूर:जमावबंदी आदेशाचे उल्ल्घन करणाऱ्या ३९ जणांवर गुन्हे दाखल


चंद्रपूर/प्रतिनिधी:
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषीत केला असुन कोरोना विषाणुचा प्रसार भारतात, संपुर्ण महाराष्ट्रात गतीने पसरत असल्याने चंद्रपूर जिल्हयात या कोरोना (covid-19) विषाणु चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फौजदारी
प्रकिया संहिता १९७३ चे कलम 144 (१) (३) अन्वये जिल्हाधिकारी
चंद्रपूर यांनी जमावबंदी आदेश निर्गमित केळे असतांना सुध्दा बरेच नागरीक सदर जमावबंदी आदेशाचे उल्लघंन करुन रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याचे आढळुन आल्याने दिनांक १९ मार्च, २०२० ते २४ मार्च,
२०२० पावेतो जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन
करणार्‍्यांविरूध्द भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ अन्वये ३९ गुन्हे
दाखल करण्यात आलेले आहेत.

तरी, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी चंद्रपूर जिल्हयातील
सर्व नागरीकांना याद्वारे पुनश्च: आवाहन केले आहे की, चंद्रपूर जिल्हयात
कोरोना (covid-19) विषाणु चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाद्वारे निर्गमित
Image
केलेल्या संचारबंदी आदेशाचे पाळन नागरीकांनी काटेकोरपणे करुन स्वत:चे आणिं इतरांचे जिव धोक्यात टाकु नये. तसेच पोलीसांना सहकार्य करावे.

संचारबंदी आदेशाचे उल्ल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतांविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वानी नोंद घ्यावी.