ट्रकखाली दबून २ शिक्षकांचा जागीच मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

ट्रकखाली दबून २ शिक्षकांचा जागीच मृत्यू

अन रस्ता बघत होता त्या २ शिक्षकांच्या मृत्यूची वाट 

ललित लांजेवार/
चंद्रपूर जिल्ह्यात नागभिड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तळोधी जनकापुर रोडवर धान्याने भरुन असलेला ट्रक पलटुन शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला.

या ट्रकखाली शिक्षकाची चारचाकी वाहन दबून चेंदामेंदा झाले .यात महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गुलाबराव कामडी व जेष्ठ सहायक शिक्षक दादाजी फटाले यांचे या दोन्ही गणमान्य शिक्षकांचे निधन झाले.धान्यांची पोती ट्रकमध्ये भरून तळोधी वरून नागभीड कडे जात असताना हा अपघात झाला. पळसगाव जनकापूर मध्ये या गावात रस्त्यावर रोडचे काम चालू आहे.तेथे ठीक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे धानाचे पोते भरलेला ट्रक चारचाकी वाहनावर पलटला. त्यामुळे जागीच त्या चारचाकी वाहनात असलेल्या दोन शिक्षकांच्या मृत्यू झाला.

 दोन्ही शिक्षक हे तळोधी मधील महात्मा फुले विद्यालयात कार्यरत आहेत.१० वीचे पेपर सुरु असल्याने या शिक्षकांवर त्याची जबाबदारी होती. निधन वार्तने परिसरात शोककळा पसरली आहे. मागील अनेक दिवसांपासून नागभीड पासून तर सिंदेवाही व समोर रोड रुंदीकरणाचे काम सुरु आहे. मात्र हे काम करत असतांना कच्या मार्गाने वाहतूक मार्गस्थ करण्यात आली आहे. मात्र मागील ४ महिन्यापासून या कच्या मार्गावर अनेक मोठ मोठे खड्डे पडले आहेत, ते खड्डे बुजविण्यासाठी मार्गाचे ठेकेदार व बांधकाम विभाग अधिकारी व संबंधित विभाग हे गांभीर्याने घेत नाही ,वारंवार यांच्याकडे तक्रार केली जाते मात्र ते याकडे लक्ष देणे टाळतात व त्यांच्या या दुर्लक्षित पणामुळे सर्वसामान्यांचा मृत्यू होतो.

 यात कोणाला आपले आई,वडील,भाऊ, काका,मामा ,मुलगा,मुलगी अश्या आप्तांच्या नात्याला गमवावे लागते, या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून संपूर्ण रस्त्यावर पडलेले खड्डे तत्काळ बुजविण्याचे आदेश द्यावे अशी विनंती नागभीड,तळोधी,व सिंदेवाहीचे नागरिक करत आहेत.