चंद्रपूर:दारू तस्करांच्या वाहनाला अपघात 1 ठार,1 जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

चंद्रपूर:दारू तस्करांच्या वाहनाला अपघात 1 ठार,1 जखमी

चंद्रपूर/प्रतिनिधी:
दारूबंदी असताना अनेक विविध छोट्या मार्गाने दारू जास्त शहरातून एकीकडून दुसरीकडे नेत असतात. अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहराजवळच्या रविवारी दारु तस्करी करणाऱ्या एका वाहनाला अपघात झाला, भद्रावती शहराजवळ कोंडा फाटा येथे ही घटना पहाटेच्या सुमारास घडली.अज्ञात वाहनाने स्विफ्ट डिझायर या वाहनाला धडक दिली आणि हे वाहन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकले गेले. 
 गाडीत असलेल्या एकाचा या घटनेत जागीच मृत्यू झाला, नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बहुतांशी दारूही लुटून नेली.या अपघातात 27 वर्षीय वसीम लियाकत अली यांचा मृत्यू झाला आहे. MH 32 सी 9980 ही कार वरोरा भद्रावती रोडच्या टाकळी गावाशेजारी आली असता ती चार पालट्या घेत रस्त्याच्या कडेला जाऊन पडली,  तर हिंगणघाट येथील रहिवासी फारुख शेख हबीब या जखमी हा भद्रावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.