करवसुली मोहिमेअंतर्गत ४७ लाखांची वसुली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ मार्च २०२०

करवसुली मोहिमेअंतर्गत ४७ लाखांची वसुली

कर न भरणाऱ्यांचे नळ कनेक्शन खंडीत, सील करताच त्वरीत करवसुली

चंद्रपूर   - चंद्रपूर शहर मनपाच्या करवसुली मोहिमेअंतर्गत २८ व २९ फेब्रुवारी या दोन दिवसात ४७ लाखांची वसुली करण्यात आली आहे तसेच कर भरणा न करणाऱ्या वडगाव प्रभागातील गुरबाजसिंग गोत्रा व यशवंत लक्ष्मण नगरकर यांचे नळ कनेक्शन कापण्यात आले आहे. जटपुरा, घुटकाला वार्ड, अंचलेश्वर वार्ड, रहमत नगर, घुटकाळा, शास्त्रीनगर, बाबुपेठ इंदिरानगर चांदा रयतवारी इत्यादी मनपाच्या तीनही झोन अंतर्गत प्रभागात सदर मालमता कराची वसुली करण्यात आली आहे.
सहायक आयुक्त शीतल वाकडे यांच्या नेतृत्वात झोन क्रमांक १ मधे ८ लाख ७९ हजार, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक यांच्या नेतृत्वात झोन क्रमांक २ मधे १७ लाख ४९ हजार तर सहायक आयुक्त सचिन पाटील यांच्या नेतृत्वात झोन क्रमांक ३ मधे २० लाख ७२ हजार रुपयांची करवसुली करण्यात आली आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेची मालमत्ता कर वसुली मोहिम मा. आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात क्षेत्रीय अधिकारी भाऊराव सोनटक्के, नरेंद्र बोभाटे, सुभाष ठोंबरे यांच्याद्वारे वसुली मोहीम माहे फेब्रुवारी २०२० पासून सातत्याने राबविली जात आहे. जास्तीत जास्त मालमत्ता धारकांनी कराचा भरणा करावा. या दुष्टीने मनपाने २१ मार्च २०१९ पर्यंत शास्ती मध्ये १०० टक्के व ५० टक्के याप्रमाणे टप्पाटप्याने सूट देण्याचे धोरण स्विकारले. याआधी मनपा जप्ती पथकाद्वारे काही मालमत्तांवर सिल ठोकण्याची कारवाई करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे थकबाकी आहे त्यांनी करभरणा न केल्याने नळ कनेक्शन कापण्याची सक्त कारवाई करण्यात येत आहे. अनेक भागात सील केल्याने त्वरीत वसुली भरण्याचे तसेच नळ कनेक्शन कापताच करभरणा करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे.
यापुढे ही थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरु राहणार असून शास्तीचा भुर्दंड वाढतच राहणार आहे. २१ मार्चनंतर २४ टक्के शास्तीचा भुर्दड थकबाकीदारांवर पडणार आहे. तेव्हा मालमत्ता धारकांनी कराचा भरणा करुन जप्तीची कारवाई टाळण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.