मुंबई,नागपूर गोवा,पुण्यानंतर आता वर्ध्यातही जमावबंदी कलम 144 लागू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

मुंबई,नागपूर गोवा,पुण्यानंतर आता वर्ध्यातही जमावबंदी कलम 144 लागू

वर्धा/प्रमोद पाणबुडे:  
संपूर्ण जगभरात आणि देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशात सर्वच जिल्ह्यांध्ये आणि शहरांध्ये खबरदारी म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबई, गोवा, पुण्यानंतर आता नागपूर आणि वर्धामध्येही जमावबंदी म्हणजेच कलम 144 लागू करण्यात आला आहे.

 आजपासून 31 मार्चपर्यंत हा कायदा लागू करण्यात आला असल्याचे आदेश वर्धा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिले आहेत.कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देऊ नये असंही जिल्हाधिकारी याच्याकडून सांगण्यात येत आहे. 


  या काळात कोणत्याही कार्यक्रमाला, मोर्चाला, सभेला परवानगी मिळणार नाही. ‘कलम 144’ म्हणजे जमावबंदी हा संबंध जोडला जात असला, तरी यावेळी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीसाठी हे कलम लागू करण्यात आले आहेत, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, काळजी घ्यावी, सार्वजनिक जागी किंवा समारंभात जाणे टाळावे, असं आवाहन केलं आहे.