नागपुरात आढळला कोरोनाचा आणखी एक रुग्ण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ मार्च २०२०

नागपुरात आढळला कोरोनाचा आणखी एक रुग्ण

Image result for mayo hospital nagpur
नागपूर/ललित लांजेवार:
नागपुरात 11 मार्च रोजी आढळून आलेला पहिला कोरोना विषाणूबाधित रुग्ण गुरूवारी कोरोना मुक्त झाला. हा रुग्ण घरी जात नाही तोच एक ४३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले .

या रुग्णाचा अहवाल हा पॉजिटीव्ह आल्याने वैद्यकीय क्षेत्रच चांगलीच खळबळ उडाली. हे गृहस्थ व्यवसायानिमित्त दिल्ली येथे गेले होते. 18 मार्च रोजी ते नागपुरात परत आले होते. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या

5 वर पोहचली आहे.बुधवारी त्यांना कोरोना विषाणूची लक्षणे आढळून आली.यामुळे मेयोत ते स्क्रिनिंगसाठी आले. दरम्यान ते कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांना तत्काळ मेयोत दाखल करण्यात आले.