गारखेड़ा येतील जिल्हा प्राथमिक शाळा येथे चौथवा वार्षिक कला महोत्सव - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ मार्च २०२०

गारखेड़ा येतील जिल्हा प्राथमिक शाळा येथे चौथवा वार्षिक कला महोत्सव

येवला प्रतिनिधि/ विजय खैरनार

येवला: तालुक्यातील गारखेड़ा येतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधे काल कला महोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाला प्राथमिक शाळाचे हे चौथवे वर्ष होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून येवल्याचे तहसीलदार सन्मानीय श्री. रोहिदास वारुळे हे होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी तहसीलदार यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल व शिक्षकांच्या कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढले. ग्रामीण भागातील व विशेष म्हणजे जि. प. शाळेने अशा पद्धतीचे आयोजन केल्याबद्दल व शाळेने वर्षभर राबविलेल्या उपक्रमाबद्दल  त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप वारुळे व  शिक्षिका श्रीमती माला राठोड यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध रेकॉर्ड गीत व नाटिका सादर करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मुख्याध्यापक श्री संदीप वारुळे व सौं. पूनम वारुळे यांनी केले व विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी श्रीमती माला राठोड यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रम प्रसंगी गावचे सरपंच श्री संजय खैरनार, उपसरपंच सौं.मीराबाई खैरनार,  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. संतोष खैरनार, पोलीस पाटील श्री. सुनिल झाल्टे, श्री. रमाकांत वारुळे, श्री. अमोल आडे  तसेच  शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते. सर्व बाल कलाकारांनी आपल्या नृत्य आविष्कारातून उपस्थित्यांची मने जिकूंन घेतली. या बाल कलाकारकांच्या  कलागुणांना प्रोत्साहन देत उपस्थितांनी बक्षीस दिले व सदर कार्यक्रम प्रसंगी शाळेचे कौतुक केले.