महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांचा अपघाती मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांचा अपघाती मृत्यू

Image may contain: 1 person, closeup and outdoor
नागपूर: महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत कळताच लोहमार्ग पोलीस तसेच आरपीएफने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना त्यांच्या खिशात पैसे, ओळखपत्र, मोबाइल आदी साहित्य सापडले. त्या आधारेच लोहमार्ग पोलिसांनी महावितरणच्या एका अधिकाऱ्याशी संपर्क साधला व या घटनेबाबत कळविले. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १२च्या सुमारास शासकीय वाहनाने घुगल रेल्वे स्थानकावर आले. मित्राला घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर मुंबईच्या बाजूने असलेल्या रल्वे मार्गावर ते चालत गेले आणि पार्सल ऑफिसच्या थोडे पुढे त्यांनी धावत्या मालगाडीखाली उडी घेतली.घुगल यांनी आत्महत्या केली कि त्यांचा तोल गेला याबाबत चौकशी सुरु आहे. 

घुगल हे काटोल मार्गावरील महावितरणच्या कॉलनीत राहात होते. शुक्रवारी सकाळीही १० ते ११ च्या सुमारास ते रेल्वे स्थानकावर आले होते, अशी माहिती आहे.