शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याची पहिले धुलाई,मग शहरातून काढली चप्पलाच्या हारासोबत धिंड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याची पहिले धुलाई,मग शहरातून काढली चप्पलाच्या हारासोबत धिंड


चंद्रपूर/ललित लांजेवार:
मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात.
अश्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीची चंद्रपुरात चांगलीच धुलाई करण्यात आली.


 तोंडाला काळे फासून आणि गळ्यात चप्पलांचा हार घालून गावात धिंडही काढण्यात आली. पेंढरी-कोकोवाडा गावात ही घटना घडली.तर त्याला सिंदेवाही येथे आणून शहरात  शिवसैनिकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.जितेंद्र राऊत असे या पोस्ट कर्त्याचे नाव आहे.
हा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी सतत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट  करत होता.शिवप्रेमींचा या व्यक्तीवर डोळा होता,परत आक्शेपार्ह्य पोस्त करतांना दिसला अन  शिवप्रेमींनी याच्या तोंडाला काळे फासले. व त्याची सिंदेवाही शहरात धिंड काढून पोलिसांच्या स्वाधीन केले गेले. या व्यक्तीकडून महाराजांविषयी माफी देखील मागून घेण्यात आली. जितेंद्र राऊतविरुद्ध शिवसैनिकांनी सिंदेवाही येथे रीतसर तक्रार देखील दाखल केली आहे.