ट्रकची ऑटोला जबर धडक - 6 जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ मार्च २०२०

ट्रकची ऑटोला जबर धडक - 6 जखमीबाजारगाव पंजारा घाटातील घटना


बाजारगाव /प्रतिनिधी
येथून 15 की मी अंतरावरील बाजारगाव पांजारा घाटात आज दुपारी 3 वाजता अनियंत्रित ट्रॅक ने समोरून येणारया याटोला जबर धडक दिली असता याटोचालक लक्षमण गोमाजी टेकाम 45 रा पांजरा पठार हा गंभीर जखमी झाला तर 5 जखमी झाले
प्राप्त माहितीवरून बाजारगाव येथून येरण गाव येथे याटोने प्रवाशी नेत असताना आज दुपारी 3 वाजता जात असताना पांजरा घाटात समोरून येत असलेला अनियंत्रित ट्रक CG 04 G 8885 ने याटो क्र MH 40 P 2118 ला जबर धडक दिली असता यातील याटो चालक गंभीर जखमी झाला असून त्यातील प्रवाशी आशाबाई डोंगरे 30 रा चिंचोली जगदीश राठोड 50 रा आगरगाव तांडा अनिल आडे 40 रा वंडली शारदा आडे 35 रा वंडली खेमचंद आडे हा दीड वार्ष चा मुलगा घमभिर जखमी झाले यांना लगेच खाजगी वाहनाने कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार करण्याकरिता आणले असता येथील वैदयकीय अधिकारी dr बिलाल पठाण यांनी प्राथमिक उपचार करून गंभीर 6 साही जखमी प्रवाशांना उपचाराकरिता नागपूर शाशकीय रुग्णालयात पाठविण्यात आले घटनेची माहिती कोंढाळी पोलीस स्टेशनला दिली असता पोलीस उपनिरीक्षक राम ढगे यांनी घटना पंचनाम करून ट्रक ड्रायवर नितीन तुकाराम मनोके रा पुसला जि अमरावती 38 यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे