कर निरीक्षक नंदकिशोर सातपुते 5 हजारांची लाच घेताना अटकेत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

कर निरीक्षक नंदकिशोर सातपुते 5 हजारांची लाच घेताना अटकेत
राजुरा नगर परिषदेतील घटना

राजुरा/ प्रतिनिधी

राजुरा नगर परिषदेतील कर निरीक्षक नंदकिशोर शंकर सातपुते यांना पाच हजाराची लाच घेताना आज दिनांक 17 मार्चला लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याच्या कारवाईत रंगेहात पकडले. ही कारवाई आज सायंकाळी5.00 च्या सुमारास नगरपरिषद कार्यालयात घडली.

तक्रारदार हे राजुरा येशील रहीवासी आहेत. तक्रारदार याने आजोबाच्या व वडीलांच्या मालमत्तेचा क्रमांक दुरुस्ती करण्याच्या कामाकरीता कर निरीक्षक नंदकिशोर सातपुते यांनी पाच हजाराची मागणी केली.याबाबत तक्रार कर्त्यानी लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली.
त्यांच्या तक्रारीवरून दिनांक 17 मार्च रोजी पाच हजार रुपये लाच घेताना रंगेहात नंदकिशोर सातपुते यांना पकडले.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुदलवार, पोलिस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नीलेश सुरडकर ,संतोष
येलपुलवार, संदेश वाघमारे, नरेश ननावरे, चालक राहुल ठाकरे यांनी पार पाडली.