अवैध दारूविक्रेत्यांकडून दारूबंदीचे समर्थन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ फेब्रुवारी २०२०

अवैध दारूविक्रेत्यांकडून दारूबंदीचे समर्थन


▪️व्यक्तिगत स्वार्थासाठी शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न, खोटे वक्त्यव्य.

▪️सामाजीक कार्यकर्ते प्रशांत गायकवाड यांचा पत्रकार परिषदेत आरोप.
तळोधी(बा.):- (ता. नागभीड)
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याबाबत हालचाल सुरु झाली असताना दारूचे फायदे -तोटे याबाबत पडताळणी करण्याकरिता नव्या महाविकास आघाडी सरकारने पालकमंत्र्यांच्या निर्देशावरून दारूबंदी समीक्षा समितीची स्थापना जिल्हा प्रशाषणाने केली. दरम्यान वेगवेगळ्या माध्यमातून जनतेचा कौल घेण्याचा प्रयत्न सुरु असताना सदर बाबीचा फायदा घेत नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.), सावरगाव, वाढोणा,सिंदेवाही तालुक्यातील सिंदेवाही, नवरगाव आदी गावातील मोठया प्रमाणात अवैद्य दारूविक्री करणारे दस्तुरखुद्द दारूतस्करच स्वतः चंद्रपूर येथील शासकीय कार्यालयात जाऊन दारूबंदीबाबत समर्थन करण्यासाठी एका टी.व्ही. न्युज चॅनलवर बिनधास्त बोलत असल्याची व्हिडीओ व्हायरल झाली आहे. शिवाय हजारों दारूबंदी समर्थनांचे खोटे फार्म भरून दिले. त्यात मोबाईल क्र. सुद्धा घातलेला नाही आहे.अशी पत्रकारांना माहिती देण्यात आली. दरम्यान गुन्ह्यांची नोंद असणारे सदर दारुतस्करच दारूबंदीचे खोटे समर्थन करुन शासनाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप तळोधी (बा.) येथील आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा शहर अध्यक्ष तथा सामाजीक कार्यकर्ते प्रशांत दादाजी गायकवाड यांनी केला आहे.
महाराष्ट्र शासनाने संपूर्ण जिल्ह्यात 1 एप्रिल 2015 पासून दारूबंदी मोहीम अमलात आणली
.मात्र दारूबंदीची पूर्णतः अंमलबजावणी न झाल्याने दारूबंदी असताना सुद्धा मद्यसम्राटांकडून अवैद्य मार्गाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारू येऊ लागली. यामुळेच दारूबंदी मोहीम असफल ठरली. परिणामी गावोगावात दारूचा महापूर वाहू लागला. आणि तरुण, शाळकरी मुलें दारूविक्रीच्या कामात गुंतून स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्थ करू लागले. दरम्यान अलीकडे शासनाकडून दारूबंदी उठविण्याबाबत जिल्हा दारूबंदी समीक्षा समिती स्थापन करुन नागरिकांचे मत मागविण्याचा उपक्रम सुरु झाला. आणि अवैद्य दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले. त्यांचे व्यवसाय सुरु राहावे या साठी दारूबंदी न उठविण्याच्या बाजूने सावरगाव,तळोधी (बा.) परिसरातील तळोधी (बा.), सावरगाव, वाढोणा, सिंदेवाही परिसरातील नवरगाव येथील इंदिरा रामकृष्ण राऊत, पुष्पा मोहन येरमे, निवृत्ती कामडी, सरिता सत्यवान पर्वते, देविका अशोक पाकेवार,व यशोदा उर्फ नानी सुकरू पसाके यांनी चंद्रपुरातील शासकीय कार्यालयात जाऊन दारूबंदी समर्थनांचे निवेदनें दिली. आणि एका टि. व्ही. चॅनलवर मुलाखत देऊन व्हिडीओ व्हायरल केला. जे की ही सदर मंडळी स्वतःच अवैद्य दारू विक्रेतें आहेत. आणि यापैकी काहींवर गुन्हें सुद्धा दाखल आहेत. असा खुलासा गायकवाड यांनी केला. त्यांची ही धडपड स्वतःच्या स्वार्थासाठी असून जनतेची व शासनाची दिशाभूल करण्याचे ते काम करीत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. दरम्यान सदर अवैद्य दारूविक्रेत्यांची व त्यांच्या अवैद्य संपत्तीची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला भाजपा शहर अध्यक्ष तथा सामाजीक कार्यकर्ते प्रशांत गायकवाड, कार्यकारी दंडाधिकारी रामदास लोनबले, भाजपा जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष रुपेश डोर्लीकर, माजी ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र मानकर, माजी उपसरपंच नरेंद्र खोब्रागडे यांची उपस्थिती होती.
" व्हिडिओत बोलणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल असल्याचे प्रूफ आहेत. शिवाय त्यांच्यातीलच काहींच्या कुटुंबातील काही जणांवर सुद्धा दारूविषयक गुन्हें दाखल आहेत. त्यांचे सुद्धा प्रूफ आहेत. "
- प्रशांत गायकवाड
     सामाजीक कार्यकर्ते
          तळोधी (बा.)