संत गाडगेबाबा जयंती महोत्सवी चमत्कार अन् भांडाफोड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ फेब्रुवारी २०२०

संत गाडगेबाबा जयंती महोत्सवी चमत्कार अन् भांडाफोड

मूल शहरांत कार्यक्रम आयोजितप्रतिनिधी/ अमित राऊत, मूल
कर्मयोगी संत गाडगेबाबा बहूउद्देशिय संस्था मूल, मूल तालुका वरटी धोबी समाज समिती आणि संत गाडगेबाबा महिला बचत गट यांचे संयुक्त विध्यमाने वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा जयंती महोत्सव मूल शहरात साजरा करण्यात आला. प्रथम सकाळी मूल शहरातील गांधी चौकातुन ते तहसील कार्यालया पर्यंतचा परिसर झाडू घेऊन साफ करण्यात आला. त्यानंतर दुपारी कन्नमवार सभागृहात मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, उदघाटक जिल्हा परिषदेचे अध्यक्षा संध्याताई गुरुनुले,कार्यक्रमाचे मार्गदर्शक डा. राजेशजी शीरसागर, पंचायत समिती सभापती चंदू मारगोनवार,नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी संत गाडगेबाबा यांचे विचार प्रत्यक्षात कृतीत आणा. असे सांगितले. संध्याताई गुरुनुले यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
यावेळी संत गाडगेबाबा वैज्ञानिक दृष्टिकोन तथा अंधश्रद्धा निर्मूलन प्रात्यक्षिकासह चमत्कार व भांडाफोड कार्यक्रम यावेळी दाखविण्यात आला. सादरकरते अंधश्रद्धा निर्मूलनचे धनंजय तावादे, सामाजिक कार्यकर्ते राजेश ब्राम्हने, शिरीष गोगुलवार आदी उपस्थित होते.