हिंगणा मेट्रो डेपोचे काम वेगाने सुरु #nagpur #Metro - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ फेब्रुवारी २०२०

हिंगणा मेट्रो डेपोचे काम वेगाने सुरु #nagpur #Metro


• डेपो अंतर्गत विविध महत्वाचे विभाग स्थापित


नागपूर ०१ : पूर्व – पश्चिम मेट्रो कॉरीडोर दरम्यान असलेल्या हिंगणा डेपोचे कार्य जलद गतीने सुरु आहे. नुकतेच, म्हणजे २८ जानेवारीला या एक्वा मार्गीकेवर प्रवासी वाहतूक सुरु झाली आहे. सुमारे ६५ एकर परीसरात हिंगणा मेट्रो डेपोचे कार्य सुरु असून यापैकी ३०.१९ एकरचा परिसर हा रोलिंग स्टॉकच्या मेंटेनस कार्याकरीता वापरण्यात येणार आहे.
या डेपोमध्ये प्रामुख्याने रोलिंग स्टॉक विभागाशी संबंधित इमारती असून ज्यामध्ये टाईम आणि सिक्युरिटी कार्यालय, ऑटोमेटीक कोच वाशिंग प्लांट, ट्रॅक्शन सबस्टेशन, प्रशासकीय इमारत, ऑक्झीलरी सबस्टेशन, अंडरग्राउंड टॅक व पंप रूम, मेंटेनंस इमारत, पीठ व्हील लेंथ, इंजिनियरिंग ट्रेन युनिट (ईटीयु), आंतरिक प्लॅटफार्म क्लिनिंग तसेच अनलोडिंग प्लॅटफार्मचा समावेश आहे.

*मेट्रो डेपो अंतर्गत असलेल्या विविध विभागांची भूमिका पुढील प्रमाणे :*

*१. टाईम आणि सिक्युरिटी कार्यालय:* टाईम आणि सिक्युरिटी कार्यालय डेपोच्या प्रवेश स्थानी असून, याचे निर्माण कार्य प्रगती पदावर आहे. संपूर्ण डेपोच्या सुरक्षेची जवाबदारी या कार्यालयावर आहे.
*२. ऑटोमेटीक कोच वाशिंग प्लांट :* ऑटोमेटीक कोच वाशिंग प्लांट मध्ये ट्रेनची सफाई करण्यात येते. मेट्रो गाडीला साफ ठेवण्यात या विभागाची महत्वाची भूमिका असते. या प्लांटचे निर्माण कार्य पूर्ण झाले आहे.
*३. ट्रॅक्शन सबस्टेशन :* ट्रॅक्शन सबस्टेशन इमारतीच्या माध्यमाने विद्युत पुरवठा होत असून राज्य विद्युत पुरवठा विभागाकडून प्राप्त होणारा ३३ केव्हीचा (किलो व्होल्ट) विद्युत पुरवठा २५ केव्ही पर्यत आणल्या जातो.
 
*४.    ऑक्झीलरी सबस्टेशन :* ऑक्झीलरी सबस्टेशनचा उपयोग डेपो मधील इमारतीद्वारे एलटी पॅनलच्या माध्यमातून विद्युत पुरवठा करण्याकरीता होत असून याचे निर्माण कार्य सुरु आहे.
 
*५.    अंडरग्राउंड टॅक व पंप रूम :* पंप रूम इमारतीचा उपयोग डेपो परिसरात असलेल्या इमारतींना पाणी पुरवठ्या करण्याकरता होणार असून याशिवाय हा विभाग विविध इमारतींच्या फायर लाईनशी जोडलेला आहे.


*६.    मेंटेनंस इमारत :* सदर इमारतीचा उपयोग ट्रेनच्या देखरेखी करीता होणार असून देखभाल व देखरेखीचे सर्व साहित्य व ट्रेनचे विविध भाग या ठिकाणी उपलब्ध होतील.
 
*७.    पीठ व्हील लेंथ :* या इमारतीमध्ये व्हील ओरियन्टेशन मशीन स्थापित असून या ठिकाणी ट्रेनच्या चाकाची ठराविक कालावधी नंतर चाचणी केल्या जाईल.
 
*८.    इंजिनियरिंग ट्रेन युनिट (ईटीयु) :* या इमारतीचा उपयोग ट्रॅक मशीन रीरेलिंग साहित्य ठेवण्या करिता होणार असून सध्यस्थितित सदर इमारतीचा उपयोग रोलिंग स्टॉकच्या देखरेखी करीता केला जातो.
 
*९.    अनलोंडिंग प्लॅटफार्म :* या प्लेटफार्मचा उपयोग नवीन ट्रेनला रुळावर उतरविण्याकरीता केला जातो.
याशिवाय आंतरिक प्लॅटफार्म क्लिनिंग, स्टेबलिंग लाईन्स व बायोडायजेस्टर इमारतीचे निर्माण कार्य जलद गतीने सुरु आहे.