सावरगाव येथे रथसप्तमीनिमित्त जागतिक सूर्यनमस्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ फेब्रुवारी २०२०

सावरगाव येथे रथसप्तमीनिमित्त जागतिक सूर्यनमस्कार५१,००० सुर्यनमस्काराचा संकल्प पूर्ण करण्यात आला


१०० लिटर दुध वाटून संकल्पाची सांगता


संकल्प पूर्ण झाल्याप्रसंगी मंडळाच्यावतीने१०० टी शर्टचे वाटपसावरगाव :- स्थानिक श्री-मुनिश्वर महाराज मंदिर,सावरगाव येथे सूर्यनमस्कार मंडळाच्या वतीने आज दिनांक ०१/०२/२०२० ला रथसप्तमीनिमित्त जागतिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होतेे.सकाळी ७:०० वाजता येथील प्रांगणात सामूहिक सुर्यनामस्कार टाकण्यात आले.यावेळी शेकडो सूर्यनमस्कार उपासक,आबाल,वृद्ध, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

स्थानिक सूर्यनमस्कार मंडळाच्या वतीने पौष महिन्यात सव्वा महिना दररोज सकाळी६:०० ते ७:०० पर्यंत सूर्यनमस्कार टाकण्यात येते.गेल्या ४६ वर्षांपासून ही परंपरा कायम आहे.ही परंपरा स्वर्गीय देवरावजी लांभाडे गुरुजी यांनी सुरू केली होती.ती आजतागायत सुरू आहे.यावर्षी सुद्धा सव्वा महिन्यापासून सूर्यनमस्कार टाकण्यात आले.दरवर्षी येथे कडाक्याच्या थंडीतही शेकडो आबाल,वृद्ध,युवक मोठ्या संख्येने सुर्यनमस्कारासाठी उपस्थित झाले.

या ठिकाणी सुर्यनमस्कार मंडळाच्या वतीने यावर्षी ५१,०००(एक्कावन्न हजार)सूर्यनमस्कार टाकण्याचा संकल्प करण्यात आला होता.मंडळाच्या वतीने आज दिनांक ०१/०२/२०२० ला सकाळी ७:०० वाजता स्थानिक मुनिश्वर महाराज मंदिर येथे सामूहिक सूर्यनमस्कार टाकून ५१,००० सुर्यनामस्काराचा संकल्प पूर्ण करण्यात आला.गेल्या सव्वा महिन्यापासून एकूण-६२९८५ सूर्यनमस्कार टाकण्यात येथे टाकण्यात आले हे विशेष.संकल्प पुर्ती निमित्त मंडळाच्यावतीने १०० टी शर्टचे वाटप करण्यात आले.

सुर्यनामस्काराचा संकल्प पूर्ण झाल्यानिमित्त सर्व उपस्थित सूर्यनमस्कार मंडळाच्या उपासकांना व गावातील विद्यार्थी व नागरिकांना १०० लिटर दुधाचा प्रसाद वितरित करण्यात आला.तसेच दिनांक ०२/०२/२०२० ला सुर्यनामस्काराची सांगता करण्यात येईल.सकाळी १०:०० वाजता श्री मुनिश्वर महाराज यांच्या समाधीचा अभिषेक पूजा करण्यात येईल.तसेच दुपारी १:०० वाजता महाप्रसाद वितरित करून सांगता करण्यात येईल.तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सूर्यनमस्कार मंडळाचे अध्यक्ष सुरेशजी जयस्वाल व मंडळाच्या सर्व सदस्यांनी केले आहे.