दारुबंदी हटविल्यास गुरुदेवभक्त करणार आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२५ फेब्रुवारी २०२०

दारुबंदी हटविल्यास गुरुदेवभक्त करणार आंदोलन
चंद्रपूर/ प्रतिनिधी
शासनाच्यावतीने दारूबंदी उठविण्यात आल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या सर्व शाखा इतर सर्व संघटनासह या निर्णयाविरोधात आंदोलन करेल याची नोंद घ्यावी, असे प्रकाश वाघ सर्वाधिकारी अ . भा . श्रीगुरुदेव सेवामंडळ गुरुकुल आश्रम , जि . अमरावती. यांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हा वं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांची कर्मभूमी आहे. या जिल्ह्यात वं . राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ , गुरुकुंज आश्रम या सेवाभावी संस्थेच्या शाखा प्रत्येक गावात कार्यरत आहे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आपले संपूर्ण जीवन मानवकल्याणाकरिता खर्ची घातले . चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी व्हावी याकरिता श्रमीक एल्गार व सर्व सामाजिक संघटना तसेच श्रीगुरुदेव सेवामंडळाचे सर्व शाखांनी पाच वर्षापर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन केले . या आंदोलनाची दखल तत्कालीन शासनाने घेऊन संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घोषित केली . या घोषणेचे तमाम जनता व गुरुदेव भक्तांनी स्वागत केले . या दारुबंदीमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात चांगले वातावरण तयार झाले . परंत . सद्यस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी हटविण्यासंबंधी शासनाकडून हालचाली सुरू झाल्याचे कळते. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी हटविण्यास अ . भा . श्रीगुरुदेव सेवामंडळ व सलग्नीत शाखांचा तिब्र विरोध आहे . वं . राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी व्यसनमुक्त समाज निर्मितीकरिता कार्य केले हे सर्वश्रुतच आहे . त्यांच्या कार्याचा सन्मान करत या जिल्ह्यात दारूबंदी उठविण्यात येऊ नये, प्रकाश वाघ यांनी सांगितले.