गडचांदूर-नांदा फाटा -आवाळपुर चौपदरीकरणाची मागणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ फेब्रुवारी २०२०

गडचांदूर-नांदा फाटा -आवाळपुर चौपदरीकरणाची मागणी

Image result for चौपदरीकरण
नांदा येथील युवक कॉग्रेसची मागणी 
आवाळपुर :- 
परीसरात नावाजलेल्या सिमेंट कंपन्या आहेत. दिवस रात्र जडवाहतुकीची रेलचेल सुरु च असते. रस्ता अरुंद असल्याने अनेक अपघात घडून अनेकांना प्राण सुद्धा गमवावे लागले आहे. अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये या करिता नांदा फाटा येथील युवक काँग्रेस चा कार्यकर्त्यांनी आमदार सुभाष धोटे यांचे गडचांदूर - नांदा फाटा - आवाळपुर चौपदरीकरनाची व स्ट्रीट लाईट सह सौंदर्यीकरणाची मागणी केली आहे.

गडचांदूर -वणी राज्यमार्ग बिबी ,नांदाफाटा , आवारपूर या शहरांना जोडत असून सिमेंट उद्योगामुळे या राज्यमार्गावर मोठ्याप्रमाणात जड वाहतुकीची सततची वर्दळ असते कोरपना तालुक्यातील सिमेन्ट उद्योगामुळे बिबी , नांदा , आवारपूर व परीसरातील अनेक गावांच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे रस्ते अरुंद असल्याने परिसरातील शेकडो नागरिकांनी रस्ते अपघातात जीव गमाविला आहे १९८५ मध्ये सिमेंट कंपनीची निर्मिती झाली असून मागील ३५ वर्षापासून बिबी - नांदाफाटा - आवारपूर या राज्यमार्गाचे रुंदीकरण करण्यात आलेले नाही नांदाफाटा बाजारपेठेतील अतिक्रमणामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यावर चालावे लागते.

अल्ट्राटेक कंपनीमधून येणारे जड वाहने चौकातून पलटविता येत नाही मागील वर्षी एका नेत्याने अतिक्रमण हटवण्यासाठी उपोषण केले होते अतिक्रमणाचा प्रश्न निकाली न निघाल्याने आता त्याने स्वतःच पानठेला भरचौकात आणून ठेवला आहे नांदाफाट्याला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचे कार्यालय व स्वतंत्र पोलिस चौकी आहे बाजारपेठेतील सुरळीत वाहतुकीच्या संबंधाने पोलिसांकडे विचारणा केली असता ते ग्रामपंचायतींकडे बोट दाखवितात ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता असल्याचे सांगते सार्वजनिक विभागाचे अधिकारी कितीदा अतिक्रमण हटवायचे असा उलट प्रश्न करतात.

एकीकडे मागील ५ वर्षात बल्लारशा , मूल , चंद्रपूर याठिकाणी मोठमोठे रस्ते बांधण्यात आले परंतु कोरपना तालुक्याला जाणीवपूर्वक विकासापासून कोसोदूर ठेवण्यात आल्याचे नांदा शहर काँग्रेस कमिटीचे सचिव व नांदा ग्रामपंचायतचे सदस्य अभय मुनोत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले सत्ता परिवर्तन झाले असल्याने नांदा शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुभाष भाऊ धोटे यांना गडचांदूर - वणीला जोडणार्‍या राज्यमार्गावरील बिबी ते नांदाफाटा व आवारपूर पर्यंत रस्त्याच्या चौपदरीकरण व स्ट्रीटलाईटसह सौंदर्यीकरण करण्याची मागणी केली आहे या रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यास बाजारपेठेतील अतिक्रमणाचा प्रश्न निकाली निघणार व विद्यार्थी कामगार व नागरिकांना सुध्दा मोठा दिलासा मिळणार आहेत