महाकाली मंदिरावर चोरट्याचा डल्ला:चोरीच्या पैश्यातून चोरट्याने केली महागडी शॉपिंग - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

११ फेब्रुवारी २०२०

महाकाली मंदिरावर चोरट्याचा डल्ला:चोरीच्या पैश्यातून चोरट्याने केली महागडी शॉपिंग

ललित लांजेवार/चंद्रपूर:
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले चंद्रपुर येथील महाकाली मंदिराच्या कार्यालयातून एका चोरट्याने तब्बल ६ हजार रुपयावर  मारला. आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली आहे. तनवीर कादिर शेख असे आरोपीचे नाव आहे. 

चंद्रपुरातील महाकाली मंदिराच्या आवारात असलेल्या कार्यालयात मंदिरातील मॅनेजरची खोली आहे. अशातच आरोपीने आलमारीतून सहा हजारांची चोरी केली.याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला जेरबंद केले असून त्याच्याजवळून ३ हजार ८०० रुपये जप्त केले.

सोबतच त्या चोरीच्या पैशातून त्याने कपडे खरेदी केले होते. पोलिसांनी कपडे सुद्धा जप्त केले आहे. हि कारवाई पोलीस निरीक्षक बहादुरे यांच्या मार्गदर्शनात बाबा डोमकावले,शरीफ शेख, विकास निकोडे,सुधाकर रंगारी, प्रमोद डोंगरे,मंगेश आदींनी केली आहे.