शेतीला शिक्षणाची जोड द्या:खासदार बाळू धानोरकर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ फेब्रुवारी २०२०

शेतीला शिक्षणाची जोड द्या:खासदार बाळू धानोरकर

खैरे कुणबी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 समाजाने मुख्य प्रवाहात येण्याकरिता शिक्षणाची सोबत असणे आवश्यक आहे. कुणबी समाजाच्या मुख्य व्यवसाय शेती आहे. यामध्ये शिक्षणाची जोड देत आधुनिक शेती केल्यास कुणबी समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात आल्याशिवाय राहणार नसल्याचे मत खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले. ते खैरे कुणबी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी बोलत होते. 

. तालुक्यातून खैरे कुणबी समाजातून इयत्ता १० वीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक आसावरी आत्माराम देशमुख, द्वितीय क्रमांक संकेत पुंजेकर आणि तृतीय क्रमांक संपादन केल्याबद्दल अनमोल डबरे यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच तालूक्यातून इयत्ता १२ वी च्या परीक्षेत प्रथम कमांक संपादन केल्याबद्दल पुजा दशरथ सातपूते, द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल प्रणय भोयर यांचा सत्कार करण्यात आला.एमएस्सी फायनलच्या परीक्षेत ७२ टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल अंजली रोहणकर तसेच राज्यस्तरीय रबरी बॉल स्पर्धैत उत्कृष्ठ कामगीरी केल्याबद्दल टनिषा पोटे हिचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

या सोहळ्याचे प्रास्ताविक सेवानिवृत्त प्राचार्य व्ही.एन. मांडवकर, अहवाल वाचन व सुत्रसंचलन आत्माराम देशमुख आणि आभार प्रदर्शन प्रविण मांडवकर यांनी केले. या कार्यक्रमाला खैरे कुणबी समाज बंधू -भगिनी फार मोठया संख्येत हजर होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हनुमान घोटेकर, अश्वीन हुलके, प्रशांत राऊत, प्रा. संजय बोरकुटे, प्रा. देवेन्द्र पुसदेकर, मारोतराव सहस्त्रबुध्दे, लक्ष्मणराव घुगरे, निलेश बोरकुटे, महेश वाघरे, सुभाष सहस्त्रबुध्दे, दशरथ सातपूते यांच्यासह समाज बांधवांनी सहकार्य केले.