सावली येथे राज्यव्यापी धरना आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ फेब्रुवारी २०२०

सावली येथे राज्यव्यापी धरना आंदोलनसावली : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी, महिलांवरती वाढते अत्याचार,बेरोजगारी, कर्जमाफी, भाजपा सरकारच्या काळातील विकासकामांना स्थगिती अशा विविध मागण्या घेऊन आज सावली तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसील कार्यालय सावली समोर राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले.
महाआघाडी सरकार हे फसवे सरकार असून त्यांनी जनतेच्या जनाधाराचा अपमान केलेला आहे.या सरकारच्या काळात दिवसेंदिवस महिलांवरती अत्याचार वाढत आहेत, शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचे खोटे आश्वासन दिले गेले असून अतिवृष्टी,दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५००० हजार देण्याची भूलथापना देण्यात आली आहे याचा निषेध म्हणून आज २५ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू केले आहे.याच पार्श्वभूमीवर सावली तालुका भाजपच्या वतीने सुद्धा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलेले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष अविनाश पाल , सतीश बोम्मावार (महामंत्री),संजय गजपुरे जिल्हा महामंत्री तथा जि प सदस्य,संतोष तंगडपल्लीवार(माजी बांधकाम सभापती),रवी बोलीवर, प स उपसभापती, योगिता डबले,मनीषा चिमूरकर जि प सदस्य,छाया शेंडे माजी प स सभापती,गणपत कोठारे प स सदस्य, विनोद धोटे युवा अध्यक्ष, अशोक आक्कूलवार, प्रकाश खजांजी,अर्जुन भोयर,अरुण पाल,सुदर्शन चामलवार,राकेश कोंडबंतूनवार,प्रसाद जक्कुलवार,देवानंद पाल,प्रवीण देशमुख, शरद सोनवणे, गोटू गुरनुले,व इतर मान्यवर भाजपा पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन महामंत्री दिलीप ठिकरे व आभार प्रदर्शन दीपक शेंडे यांनी केले.व तहसीलदार कुमरे मॅडम यांना निवेदन देण्यात आले.