हिंगणघाटच्या त्या आरोपीस कठोर शिक्षा द्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

११ फेब्रुवारी २०२०

हिंगणघाटच्या त्या आरोपीस कठोर शिक्षा द्या

पुरोगामी शिक्षक संघटना व पुरोगामी महिला
 मंच चे मुख्यमंत्र्यांना निवेदन
चंद्रपूर
हिंगणघाट येथील शिक्षिकेला भररस्त्यात जाळून टाकण्यात आले, काही दिवस जीवन मृत्यू सोबत संघर्ष करीत बिचारी अंकिता आज मृत्यू पावली मात्र तिचा व समाजाचा तो गुन्हेगार अजूनही शिक्षेपासून दूर आहे करिता महाराष्ट्राला लाजवणाऱ्या या जळीत व हत्या प्रकरणातील आरोपीस कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती व पुरोगामी महिला मंच च्या वतीने मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मा.कुणाल खेमणार, जिल्हाधिकारी चंद्रपूर व मा.प्रशांत खैरे जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्फतीने प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले.

 व संबंधित गुन्हेगारास कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी याबाबत चर्चा करण्यात आली. निवेदन मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तात्काळ पाठवण्यात येईल अशी त्यांनी ग्वाही दिली तसेच जलदगती न्यायालयात हा खटला चालवण्यात येईल असेही सांगण्यात आले.

राज्य व जिल्ह्यातील शिक्षकांच्या भावनांचे निवेदन देतेवेळी पुरोगामी पदाधिकारी अल्काताई ठाकरे म.मंच राज्याध्यक्ष, विजय भोगेकर राज्य नेते, हरीश ससनकर राज्य सरचिटणीस, जिल्हा पदाधिकारी निखिल तांबोळी, सुनीता इटनकर, विद्या खटी, रजनी मोरे, प्रतिभा उदापुरे, मनोज बेले, मंजुषा फुलझेले, राजश्री खणके, ज्ञानदेवी वानखडे, प्रशांत कावळे, सपना पिंपळकर, तृप्ती भुरघाटे, प्रकाश झाडे, श्याम पाचघरे हे पदाधिकारी उपस्थित होते.