चंद्रपूर :एकाच ठिकाणी आढळला दोन अस्वली व दोन बिबट्यांचा मृतदेह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ फेब्रुवारी २०२०

चंद्रपूर :एकाच ठिकाणी आढळला दोन अस्वली व दोन बिबट्यांचा मृतदेह


चंद्रपुर/ललित लांजेवार

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील आयुध निर्माणी ला लागून असलेल्या जंगल परिसरात दोन बिबट व दोन अस्वलांचा मृतदेह एकाच ठिकाणी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा पुढील तपास सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दोन अस्वली व वाघांच्या मृत्यूचे कारण विद्युत तारेचा स्पर्श झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झालेले आहे. वनविभागाचा चमू घटनास्थळी दाखल झाला असून अधिक तपास करीत आहे.