चार सिमेंट प्रकल्प असुनही बेरोजगारी दारोदारी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ फेब्रुवारी २०२०

चार सिमेंट प्रकल्प असुनही बेरोजगारी दारोदारी

Image result for cement factory
गडचांदूर/प्रतिनिधी:
सिमेंट सिटी म्हणुन राज्यभर प्रचलीत असलेल्या गडचांदुर मधील तरुन शिक्षीत स्थानिक बेरोजगारांची सिमेंट प्रकल्पाकडुन निव्वळ थट्टाच सुरु आहे.

म्हणतात कि ज्या तालुक्यात सिमेंट प्रकल्प अस्तित्वात आहे.त्या तालुक्यात रोजगाराला काही कमतरता नसतात.परंतु हि बाब गडचांदुर शहराला अपवाद ठरली आहे.या शहरात परप्रांतीय जास्त आले असुन स्थानिकांचा रोजगार यातुन तुटला आहे.

शासनाच्या नियमाला या प्रकल्पानी पुर्नता तिलांजली दिलि आहे.गडचांदुरात तर नविन सिमेंट प्रकल्प अगदी शहरात आला असुन यामुळे भविष्यात गडचांदुरातिल नागरिकाना याचा मनस्ताप नक्की होणार आहे.शासकिय नियमानुसार ८० टक्के तर २० टक्के बाहेरिल नागरिकाना असा नियम सागंतो.मागे जिल्हा अधिकारी यांनी या नियमाचे पालन करन्यास आदेश दिले होते.परंतु कोनत्याही कपंनीने आज पर्यंत कोणत्याही शिक्षित तरूनाना काम दिलेले दिसत नाही. तर शहरात काही  तरुन बाहेरिल जिल्हयातिल नौकरीसाठी आलेले दिसते.तर काहि नागरिकांत चिरीमिरीची चर्चा सुधा रंगताना दिसते.

सारा गाव मामाचा आनि एकही  नाहि कामाचा अशा म्हनी प्रमाने सध्याचि गडचांदुरची परिस्थिती झाली आहे.कोनी म्हनतो तुमचि ओळखी असेल तर "माझ बगा ना हो" या ओळी आता खुप जुन्या झाल्या आहे.

मागे नविन प्रकलपात जागा आहे.या उद्देशाने अनेक तरुणांनी आपआपल्या पद्धतीने अर्ज केले खरे परंतु त्याना काहि एक अपेक्षीत उ्तर आले नाही.

काहि नेत्यांनी तर राजकीय भरोशावरती काहि ना आपल्या पध्दतिने जुगाड लावुन लावल्याचे समजते.ते हि आपल्या जवडचे आणि आपल्याला मदत करनार्याना लावले आहे.जिल्हा अधिकारी  साहेब 'आता तरि लक्ष द्या हो'  अशी हाक बेरोजगार करत आहे.